you can collect cash at grocery store soon; RBI is thinking
किराणा मालाच्या दुकानात रोखीने पैसेही मिळणार; आरबीआयकडे प्रस्ताव By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 1:14 PM1 / 11देशभरामध्ये एटीएमची संख्या कमालीची कमी होत आहे. कमी फायदा मिळत असल्याने बँका आणि खासगी कंपन्या त्यांचे एटीएम बंद करण्याच्या तयारीला लागले आहेत. नवीन नियमही याला कारणीभूत आहेत. असे असले तरीही व्यवहार वाढले आहेत. यामुळे ग्राहकांना रांगेत उभे राहण्यापासून पैसे संपल्याने एटीएमच्या दारातून माघारी फिरावे लागत आहे. यामुळे जवळच्या किराणा दुकानामध्येच पैसे उपलब्ध करण्याची योजना आणण्याचा विचार सुरु झाला आहे. 2 / 11इकॉनॉमिक टाईम्सच्या एका अहवालानुसार भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये आधार कार्डचे जनक आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी या समितीचे अध्यक्ष आहेत.3 / 11या समितीने छोट्या शहरांतील दुकानदारांच्या माध्यमातून पैसे पुरविण्याचे सुचविले आहे. याद्वारे लोक किराणा दुकानातून पैसे घेऊ शकणार आहेत. 4 / 11या समितीने कॅश इन कॅश आऊट (CICO) नेटवर्कचा प्रस्ताव दिला आहे. ही योजना लोकांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. 5 / 11यासाठी देशात तीन कोटी पीओएस मशीनची गरज लागणार आहे. या मशीनद्वारे ग्राहक किराणा मालाच्या दुकानातून पैसे काढू शकणार आहेत. 6 / 11किराणा मालाचे व्यवहार बहुतांशी रोखीने होत असतात. यामुळे त्यांच्याकडे पुरेशी रोख उपलब्ध असते. ही रोख फार कमी वेळा बँकांमध्ये जाते. यामुळे याचे नियोजन केल्यास किराणा दुकानदार हीच रोख रक्कम बँकांच्या ग्राहकांकडे वळविली जाऊ शकते.7 / 11ग्रामीण भागात बँकांना बऱ्याचदा रोखीसाठी मोठ्या व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. 8 / 11ही सुविधा ग्राहकांना क्यूआर कोड आणि आधार कार्डद्वारे दिली जाईल. ही सूचना आरबीआयने मान्य केल्यास सामान्य लोकांना कार्ड स्वाईप केल्यावर पैसे मिळवू शकणार आहेत. 9 / 11देशात 2011 मध्ये एकूण एटीएमची संख्या 75 हजार 600 होती. तर 2017 मध्ये ती वाढून दोन लाख 22 हजार 500 झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत एटीएमची संख्या कमी होत चालली आहे. 10 / 11देशात 2011 मध्ये एकूण एटीएमची संख्या 75 हजार 600 होती. तर 2017 मध्ये ती वाढून दोन लाख 22 हजार 500 झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत एटीएमची संख्या कमी होत चालली आहे. 11 / 11शिवाय एटीएम सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांवर सुरक्षेसाठी नवे नियम आणल्याने त्यांनीही एटीएम बंद करायला घेतली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications