You can get up to Rs 1.5 lakh tax exemption on electric car purchase; All you have to do is work!
इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्हाला मिळू शकते 1.5 लाखांपर्यंत कर सूट; फक्त करावे लागेल 'हे' काम! By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 2:04 PM1 / 7नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी सबसिडी व्यतिरिक्त केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर कर सूट देखील देते. जर तुम्ही कर्ज घेऊन इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.2 / 7 2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर कर्जावरील व्याज कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी आयकरामध्ये नवीन कलम 80EEB लागू करण्यात आले. 2020-21 या आर्थिक वर्षापासून कर सवलतीचा नियम लागू झाला आहे.3 / 7आयकर कलम 80EEB अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहनाच्या कर्जावरील व्याजाच्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट उपलब्ध आहे. ही सवलत इलेक्ट्रिक कारवरील वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी उपलब्ध असेल. 4 / 7या कलमांतर्गत कर कपात केवळ वैयक्तिक करदात्यासाठी आहे, इतर करदात्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच, तुम्ही एक एचयूएफ, एओपी, पार्टनरशिप फर्म, कंपनी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे करदाते असल्यास, तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांवर कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.5 / 7आयकर कलम 80EEB अंतर्गत कर सवलतीचा लाभ एकदाच मिळेल. म्हणजेच खरेदीदार या कर सवलतीचा फायदा फक्त पहिल्यांदा इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास घेऊ शकतो. कोणत्याही वित्तीय संस्था किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतलेल्या खरेदीदारास कर सवलत उपलब्ध असेल. कर्जाच्या व्याजावर दीड लाख रुपयांची कपात आहे.6 / 7कर नियमांनुसार, कर कपातीसाठी इलेक्ट्रिक वाहन कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 दरम्यान मंजूर केले पाहिजे. म्हणजेच, आर्थिक वर्ष 2020-21 पासून, तुम्ही कलम 80EEB अंतर्गत कर कपातीचा लाभ घेऊ शकता. 7 / 7दरम्यान, वैयक्तिक करदात्याला वित्तीय संस्थेकडून व्याज प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यासोबतच आयकर रिटर्न भरताना इतर महत्त्वाची कागदपत्रे जसे की टॅक्स इनव्हॉइस आणि कर्जाची कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. आणखी वाचा Subscribe to Notifications