शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cylinder Expiry Date: तुम्हीही LPG Cylinder वापरत असाल तर तुमच्यासाठी 'ही' महत्त्वाची माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 4:29 PM

1 / 7
नवी दिल्ली : तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणार्‍या सिलिंडरची एक्सपायरी डेटही असते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही येथे संपूर्ण माहिती घेऊ शकता.
2 / 7
सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOC) माहिती दिली होती की, सर्व एलपीजी सिलिंडर एका विशेष प्रकारचे स्टील आणि संरक्षक कोटिंगसह बनविलेले आहेत आणि त्यांचे उत्पादन BIS 3196 अंतर्गत आहे.
3 / 7
फक्त अशाच सिलिंडर उत्पादकांना ते तयार करण्याची परवानगी आहे, ज्यांना मुख्य स्फोटक नियंत्रकची (CCOE) मान्यता आहे आणि त्यांच्याकडे BIS परवाना आहे. दरम्यान, हे परिपत्रक 2007 चे असले तरी आयओसीच्या वेबसाइटवर हे देखील दिले गेले आहे की, ज्या वस्तू विशिष्ट वेळी नाश पावणार आहेत, त्यांची एक्सपायरी तारीख आहे.
4 / 7
एलपीजी सिलिंडरबद्दल बोलायचे तर, त्यांचे उत्पादन अनेक बाह्य आणि अंतर्गत मानकांनुसार मार्केटमध्ये आणले जाते, त्यामुळे त्यांची कोणतीही एक्सपायरी तारीख नसते आणि केवळ वेळेवर चाचणी केली जाते.
5 / 7
एलपीजी सिलिंडरची वैधानिक चाचणी आणि पेंटिंगसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे आणि त्यावर कोडप्रमाणे लिहिले जाते की, पुढील तारखेला ते चाचणीसाठी पाठवले जातील.
6 / 7
उदाहरणार्थ, A 2022 म्हणजे 2022 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ते चाचणीसाठी पाठवले जातील. त्याचप्रमाणे, ज्या सिलिडरवर B 2022 लिहिलेले आहे, ते 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) पुन्हा चाचणीसाठी पाठवले जातील.
7 / 7
त्याचप्रमाणे, C 2022 म्हणजे 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) ते चाचणीसाठी पाठवले जातील. D 2022 ज्या सिलिंडरवर हे लिहिलेले आहे, ते 2022 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) पुन्हा चाचणीसाठी पाठवले जातील.
टॅग्स :businessव्यवसाय