शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचा CIBIL स्कोअर खराब आहे?; तर अशाप्रकारे मिळवू शकता Personal Loan

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:12 AM

1 / 10
कोरोना महासाथीच्या संकटामुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामना करावा लागत आहे. काही जण यातून मार्ग म्हणून पर्सनल लोनच्या दिशेने वळताना दिसत आहेत.
2 / 10
परंतु जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला पर्सनल लोन मिळताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
3 / 10
अशा काही पद्धती जाणून घेऊन ज्या मार्गानं तुमचा सिबिल स्कोअर कमी असला तरी तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकतं.
4 / 10
परंतु तुम्ही आपला सिबिल स्कोअर उत्तम करावा हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला तुमच्या अटींवर कर्ज मिळू शकेल.
5 / 10
बँका सध्या लोन देताना सिबिल स्कोअर शिवाय तुमच्या सध्याच्या वेतनावरही विचार करतात. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर, तुमचं सध्याचं वेतन, वार्षिक बोनस किंवा अन्य अतिरिक्त उत्पन्नांच्या स्रोतांचं तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता.
6 / 10
त्यामुळे तुम्ही आर्थिक दृष्ट्या कर्ज फेडण्यास सक्षम आहात हे दिसून येतं. तसंच यावर विचार करून बँका तुम्हाला लोन देऊ शकतात.
7 / 10
सिबिल खराब असल्यामुळे कोणतीही बँक तुम्हाला जोखीम असलेला ग्राहक मानू शकते. यासाठी तुमची लोनची रक्कम कमी असणं आवश्यक आहे.
8 / 10
चांगला सिबिल स्कोअर तयार करण्यासाठी तुम्ही कमी लोन घेऊन ते वेळेत फेडून स्कोअर चांगला करून घेऊ शकता.
9 / 10
जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं असेल तर बँक किंवा पोस्ट ऑफिस एफडीदेखील मदतीला येऊ शकते. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटद्वारे लवकर आणि सहजरित्या कर्ज घेऊ शकता. सामान्यत: याचे व्याजदर फिक्स्ड डिपॉझिटच्या जमा दरांच्या तुलनेत एक किंवा दोन टक्के अधिक असतात.
10 / 10
सिबिल खराब असेल तर तुम्हाला बँकेतून कर्ज घेण्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एनबीएफसीकडून कर्ज मिळण्याची अधिक शक्यता असते. परंतु या ठिकाणाहून मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर अधिक आकारला जातो.
टॅग्स :MONEYपैसाbankबँकIndiaभारतbusinessव्यवसाय