शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन वर्षात तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 3:48 PM

1 / 6
2019 मध्ये म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बदलून नवीन EVM चीप असणारे कार्ड दिले जाईल.
2 / 6
जुन्या मॅग्नेटिक कार्डच्या तुलनेत नवीन कार्ड अधिक सुरक्षित आहे. जुन्या ATM किंवा डेबिट कार्डच्या मागील बाजूला एक काळ्या रंगाची पट्टी आहे. त्या काळ्या पट्टीमध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप असते. ज्यात तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध असते.
3 / 6
जेव्हा खरेदीच्या वेळी तुम्ही कार्ड स्वाईप करता पण अनेक वेळा तुमचे कार्ड रिजेक्ट केले जाते. यावेळी तुमचे कार्ड सुरक्षित नसल्याने तुमच्या खात्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला कळू शकते.
4 / 6
रिझर्व्ह बँकेनुसार मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आता जुनी टेक्नोलॉजी झाली आहे. असे कार्ड बनविणे आता बंद झाले आहे. मॅग्नेटिक स्ट्रिपचं जुने कार्ड वापरण्यासाठी सुरक्षित नसल्यानं बँकेकडून ते बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी नवीन EVM चीपचे कार्ड बँका देणार आहेत.
5 / 6
EVM चीपचे कार्ड जास्त प्रमाणात सुरक्षित आहेत. या कार्डमधून माहिती चोरी होण्याची शक्यता नाही. कारण ग्राहकांची माहिती या कार्डच्या चीपमध्ये असते.
6 / 6
या चीपमधील माहिती कॉपी करू शकत नाही. चीपमध्ये प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी वेगवेगळा कोड दिला जातो. म्हणून या कार्डमधून माहिती कॉपी करणे कठीण असते.
टॅग्स :atmएटीएमbankबँक