शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमची पत्नी २० वर्षात बनवू शकते कोट्यधीश; खात्यात असतील १.३३ कोटी, विना रिस्क असा मिळेल सुपर रिटर्न

By जयदीप दाभोळकर | Updated: April 15, 2025 11:26 IST

1 / 6
गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल, तसंच स्वत:ला अल्पावधीतच कोट्यधीश होताना पाहायचं असेल तर पत्नीची मदत घेऊ शकता. तुमच्या पत्नीच्या मदतीने तुम्ही अवघ्या २० वर्षात स्वत:ला कोट्यधीश बनवू शकता. कसं ते समजून घ्या.
2 / 6
पीपीएफ ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दीर्घ मुदतीत चांगले पैसे उभे करू शकता, तसंच इन्कम टॅक्सही वाचवू शकता. नियमानुसार, एखादी व्यक्ती आपल्या नावावर एकच पीपीएफ खात उघडू शकते. पीपीएफमध्ये जॉइंट अकाऊंट उघडण्याचाही पर्याय नाही. पण जर पत्नी आणि नवरा दोघेही कमावत असतील तर दोघेही आपापल्या नावानं स्वतंत्र खातं उघडू शकतात आणि अवघ्या २० वर्षात खात्रीशीर कोट्यधीश बनू शकतात.
3 / 6
पीपीएफ योजनेत वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. पती-पत्नी दोघांनाही वर्षभरात दीड लाख रुपये या योजनेत जमा करावे लागतील. तुम्ही एकरकमी रक्कमही जमा करू शकता किंवा दरमहा १२,५०० रुपये जमा करून वर्षभरात १.५ लाख रुपये जमा करू शकता. ही योजना १५ वर्षांत मॅच्युअर होते, परंतु आपल्याला एकदा याला मुदतवाढ द्यावी लागेल. पीपीएफची मुदतवाढ ५ ते ५ वर्षांच्या अंतरात होते.
4 / 6
पती-पत्नी दोघांनी आपापल्या पीपीएफ खात्यात वार्षिक दीड लाख रुपये जमा केले आणि हे खातं २० वर्षे चालू ठेवलं तर दोघेही आपापल्या खात्यात ३०-३० लाख रुपये जमा करतील. पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. पती-पत्नी दोघांनाही आपापल्या खात्यात वेगवेगळे व्याज म्हणून ३६ लाख ५८ हजार २८८ रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे दोघांनाही २० वर्षांत एकूण ६६,५८,२८८ रुपये मिळतील. ६६,५८,२८८ रुपये + ६६,५८,२८८= १,३३,१६,५७६ रुपये. अशा प्रकारे पती-पत्नी दोघांनाही २० वर्षांत एकूण १ कोटी ३३ लाख १६ हजार ५७६ रुपयांची भर पडणार आहे.
5 / 6
पीपीएफ गुंतवणूक ई-ई-ई श्रेणीत ठेवली जाते. म्हणजेच तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफ एक्सटेन्शनच्या बाबतीत गुंतवणूकदाराकडे दोन प्रकारचे पर्याय असतात - पहिला, योगदानासह खात्याचा विस्तार आणि दुसरा, गुंतवणुकीशिवाय खात्याचा विस्तार.
6 / 6
कोट्यधीश होण्यासाठी योगदानानं विस्तार करावा लागतो. जर तुम्हाला पीपीएफ खात्याचं योगदान चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसकडे ज्या ठिकाणी खातं आहे तिकडे अर्ज सादर करावा लागेल. मुदतपूर्तीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला हा अर्ज सादर करावा लागेल आणि मुदतवाढीसाठी फॉर्म भरावा लागेल. ज्या पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत पीपीएफ खातं उघडण्यात आले आहे, त्याच पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत फॉर्म जमा केला जाईल. जर तुम्ही हा फॉर्म वेळेत सबमिट करू शकला नाही तर तुम्ही खात्यात योगदान देऊ शकणार नाही.
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूक