Your wife can reduce EMI burden save up to 7 lakhs in taxes know Useful things how you can save
EMIचा बोजा कमी करू शकते तुमची पत्नी, ७ लाखांपर्यंत टॅक्सही वाचवेल, कसं? जाणून घ्या फायद्याची गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 8:43 AM1 / 9जर तुम्ही गृहकर्जासाठी (Home Loan) अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. गृहकर्जासाठी अर्ज करताना पत्नीचाही समावेश करा. पत्नीसोबत जॉइंट होम लोन (Joint Home Loan) घेतल्यानं अनेक फायदे मिळतात. 2 / 9पत्नीसोबत जॉइंट लोन घेतल्यास कमी व्याजदरानं गृहकर्ज मिळतं. याचा परिणाम तुमच्या ईएमआयवरही होतो. त्याचबरोबर यातून तुम्ही इन्कम टॅक्समध्येही बरीच बचत करू शकता, म्हणजेच थेट डबल बेनिफिट घेऊ शकता. जाणून घेऊ पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेण्याचे फायदे.3 / 9जर तुम्ही होम लोन कोणत्याही महिला को अॅप्लिकंट (आई, पत्नी, बहीण) यांच्यासोबत मिळून घेतलं, तर तुम्हाला लोन थोड्या स्वस्त व्याजदरावर मिळतं. जर लोन स्वस्त असेल तर त्याचा परिणाम त्याच्या व्याजदरावर होतो आणि ईएमआयही कमी होऊ शकतो.4 / 9सर्वसाधारणपणे महिला जॉईंट अॅप्लिकंटसाठी गृहकर्जासाठी स्वतंत्र व्याजदर दिला जातो. हा दर सामान्य दरापेक्षा सुमारे ०.०५ टक्के (५ बेसिस पॉइंट) कमी आहे. मात्र, याचा फायदा घेण्यासाठी महिला स्वत: किंवा संयुक्तपणे मालमत्तेची मालक असणं आवश्यक आहे.5 / 9जॉइंट होम लोनमध्ये इन्कम टॅक्सचा ही फायदा मिळतो. जॉइंट होम लोनसाठी अर्ज केल्यावर दोन्ही कर्जदारांना वेगवेगळे इन्कम टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. परंतु अर्जदारासह दोघेही मालमत्तेचे मालक असतील तरच हा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेत असाल तर तुम्हाला दुप्पट टॅक्स बेनिफिट मिळेल. 6 / 9मूळ रकमेवर तुम्ही दोघेही ८० सी अंतर्गत १.५-१.५ लाख रुपये म्हणजेच एकूण ३ लाख रुपये क्लेम करू शकता. तसंच कलम २४ अन्वये दोघांनाही व्याजावर २-२ लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट घेता येईल. अशा प्रकारे तुम्हाला एकूण ७ लाख रुपयांपर्यंत टॅक्सचा फायदा मिळू शकतो. मात्र, तुमचं गृहकर्ज किती आहे, यावरही ते अवलंबून असेल.7 / 9अनेकदा क्रेडिट स्कोअर कमी असणं, कमी उत्पन्न किंवा इतर प्रकारचं कर्ज आणि उत्पन्न रेश्योतील गडबड यामुळे लोकांना कर्ज घेण्यात अडचणी येतात. अशा वेळी जॉइंट होम लोन उपयुक्त ठरतं. यामध्ये अर्जदार म्हणून दुसऱ्या व्यक्तीची भर घालून कर्ज घेण्याची पात्रता वाढते. 8 / 9संयुक्त कर्जात गुंतलेल्या दुसऱ्या व्यक्तीची परतफेड करण्याची क्षमता चांगली असेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. दरम्यान, हा नियम कोणत्याही प्रकारच्या संयुक्त कर्जास लागू होतो, मग ते संयुक्त गृहकर्ज महिला अर्जदार किंवा पुरुष अर्जदारासह एकत्र घेतले गेले असेल तरीही याचा फायदा होतो.9 / 9एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिलं जातं. पण संयुक्त कर्जात दोघांचंही एकूण उत्पन्न दिसून येतं. अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते. परंतु लक्षात ठेवा की आपलं आणि आपल्या जॉईंट अॅप्लिकंटचं कर्जाच्या उत्पन्नाचा रेश्यो ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. आणखी वाचा Subscribe to Notifications