शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 9:04 AM

1 / 9
Income Tax Saving Tips: जर तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्याचे मार्ग शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खास आहे. फक्त ५ स्मार्ट ट्रिक्सचा अवलंब करून तुमची पत्नी तुमचा टॅक्स तर वाचवू शकतेच, पण तुमची कमाईही दुप्पट करू शकते. प्रत्येकाला या टिप्स माहित नसतात आणि त्यांचा अवलंब करून तुम्हीही म्हणाल 'वाह क्या बात है!' चला तर मग जाणून घेऊया ते ५ मार्ग, ज्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन बदलू शकतं.
2 / 9
जॉईंट होम लोन - तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही कमावत असाल आणि होम लोन घेणार असाल तर ते संयुक्तपणे घ्या. असं केल्यास दोन्ही व्यक्ती कलम 80 सी अंतर्गत मुद्दल परतफेडीवर १.५ लाख रुपयांपर्यंत आणि कलम २४ (बी) अंतर्गत व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत स्वतंत्र कर सवलतीचा दावा करू शकतात.
3 / 9
हाऊस प्रॉपर्टीमध्ये जॉईंट नेम - उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन्ही जॉइंट लोनवर टॅक्स बेनिफिट्स घेत असाल तर तुम्हाला एकूण ७ लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळू शकते. तसंच मालमत्ता संयुक्त नावावर असेल तर पत्नीही कर्जाचा ईएमआय फेडण्यात हातभार लावून मदत करू शकते.
4 / 9
कसं होईल इन्कम डबल - तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नावानं पीपीएफ खातं उघडून गुंतवणूक करा. जर तुम्ही दोन्ही खात्यांमध्ये १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला एकूण ३ लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळेल.
5 / 9
नॅशनल पेन्शन सिस्टम - पत्नीच्या नावाने एनपीएस खातं उघडा. दोघेही आपापल्या खात्यात गुंतवणूक करू शकतात आणि कलम ८० सीसीडी (१ बी) अंतर्गत ५०,००० रुपयांची अतिरिक्त कर वजावट घेऊ शकतात.
6 / 9
जोडीदार किंवा कुटुंबाच्या नाव आरोग्य विमा - जोडीदार आणि कुटुंबासाठी आरोग्य विम्याचा हप्ता भरा. कलम ८० डी अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र कर सवलतीचा दावा करू शकतात.
7 / 9
पत्नीच्या बचत खात्यावर व्याजदरात सवलत - पत्नीच्या नावानं स्वतंत्र बचत खातं उघडा. दोन्ही खात्यांना कलम ८० टीटीए अंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर सूट मिळते.
8 / 9
जोडीदाराच्या नावे एफडी किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक - जर पत्नीचं उत्पन्न कमी असेल किंवा ती गृहिणी असेल तर तिच्या नावानं फिक्स्ड डिपॉझिट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. यामुळे कराचा बोजा कमी होईल आणि परताव्याचा दावा करणं सोपं होईल.
9 / 9
फायनान्शियल पोर्टफोलिओ मजबूत करा - या टीप्सचा अवलंब केल्यास पत्नीच्या मदतीनं गुंतवणूक आणि टॅक्स प्लॅनिंग केल्यास तुमचा टॅक्स वाचेल तसंच तुमचा फायनान्शियल पोर्टफोलिओ मजबूत होईल. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाPPFपीपीएफ