शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Youtuber नं फक्त 42 सेकंदांत कमावले 1 कोटी 75 लाख रुपये; जाणून घ्या, छप्परफाड कमाईचा 'हा' खास फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:18 AM

1 / 7
एका यूट्यूबरने केवळ 42 सेकेंदांमध्ये तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली आहे. जोनाथन मा (Jonathan Ma) असे या यूट्यूबरचे नाव आहे. यामुळे तो सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे यूट्यूबवर जोमा टेक (Joma Tech) नावाचे चैनलही (Joma Tech YouTube) आहे.
2 / 7
फक्त 42 सेकंदांत कोट्यवधीची कमाई - जोनाथन चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याने नुकतेच केवळ 42 सेकेंदांत तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली. सर्व प्रकारची कटिंग होऊन जोनाथन माला 1 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत.
3 / 7
NFT च्या माध्यमाने केली कमाई - 'बिझनेस इनसाइडर' मधील एका रिपोर्टनुसार, जोनाथन माने त्यांचे NFT कलेक्शन रिलीज केले आहे, फिल्‍ममेकर बनण्याची त्याची इच्छा आहे. त्याने NFT कलेक्शनसाठी डिसकॉर्ड सर्व्हर तयार केले आहे. हे एक असे सर्व्हर असते, जेथे केवळ समान सर्व्हर असलेले लोकच त्याचे NFT कलेक्शन बघू शकतील. ज्यांच्या जवळ जोनाथनचा NFT असेल, केवळत तेच प्रायव्हेट डिस्कॉर्ड (प्रायव्हेट सर्व्हर)वर पाहू शकतील.
4 / 7
कोण आहे जोनाथन मा? फुलटाइम YouTuber बनण्यापूर्वी, जोनाथन मा फेसबुक आणि Google मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सध्या तो यूट्यूबवर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, क्रिप्टो आणि तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडिओ बनवतो. त्याच्या यूट्यूबवर 16 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
5 / 7
चित्रपट दिग्दर्शक बनणे हे जोनाथन माचे ध्येय आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्याने NFT (Nonfungible-token) लाँच केले आहे. एवढेच नाही, तर इतर लोकांप्रमाणेच जोनाथनलाही क्रिप्टोकरन्सीमध्ये रस आहे.
6 / 7
अशी सुचली आइडिया - DappRadar नुसार, गेल्यावर्षी तब्बल 18 हजार कोटींहून अधिकची NFT ची विक्री झाली आहे. जोनाथन यूट्यूबवर व्हिडिओ तयार करतो. याच वेळी त्याने आपले कलेक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला. याचा उद्देश त्याच्या चाहत्यांनी आणि सब्सक्राइबर्सनी NFT विकत घ्यावे असा होता.
7 / 7
NFT म्हणजे काय? - जोनाथन मा (Jonathan Ma)ने या महिन्याच्या सुरुवातीला आपले कलेक्‍शन 'Vaxxed Doggos' रिलीज केले. NFT म्हणजे, Non-Fungible Token. NFT डिजिटल आयटम आहे. जे ब्‍लॉकचेन टेक्‍नोलॉजी (Blockchain Technology)च्या सहाय्याने विकत घेतला जाऊ शकतो अथवा विकला जाऊ शकतो. क्रिप्‍टोकरंसी (Cryptocurrencies) आणि एनएफटी स्‍पेशलाइज्‍ड प्‍लॅटफॉर्मवर खरेदी आणि विकली जाते.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान