Zomato च्या लिस्टिंगनंतर संस्थापक दिपिंदर गोयल झाले 'सुपर रिच'; जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:14 AM
1 / 10 शुक्रवारी शेअर बाजारात झोमॅटोचं बंपर लिस्टिंग झालं. बाजार बंद होईपर्यंत या कंपनीचा शेअर इश्यू प्राईजपेक्षा ६६ टक्के अधिक म्हणजेच १२६ रूपयांवर बंद झाला होता. 2 / 10 राष्ट्रीय शेअर बाजारावर कंपनीचं मार्केट कॅप ९८,८४९ कोटी राहिला होता. यादरम्यान कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटी रूपयांच्या पुढेही पोहोचला होता. कंपनीच्या जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल भारताच्या सुपर रिच बिलिनेअर लिस्टमध्ये सामिल झाले आहेत. 3 / 10 ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार कंपनीमध्ये दीपिंदर गोयल यांचा हिस्सा ४.७ टक्के आहे आणि सध्याच्या व्हॅल्युएशननुसार ही व्हॅल्यू ६५० दशलक्ष डॉलर्सच्या जवळ आहे. 4 / 10 याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कंपनीमध्ये ३६८ दशलक्ष डॉलर्सचे स्टॉक्सही आहे. जे पुढील सात वर्षांमध्ये त्यांना मिळतील. दोन्ही मिळून त्यांचा कंपनीतील हिस्सा दुप्पट होते. कंपनीचं मार्केट कॅप १३.३ बिलियन डॉलर्स आहे. 5 / 10 सुपर रिच लोकांच्या तुलनेत दिपिंदर गोयल हे अद्यापही खुप मागे आहेत. स्टार्टअप बिलेनियर उद्योजनक ज्यांची संपत्ती १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे, यामध्ये बायजूचे रविंद्रन, पेटीएमचे विजय शेखर शर्मा आणि फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिनी बन्सल आहेत. 6 / 10 दिपिंदर गोयला यांनी मधून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असताना त्यांना पिझ्झा ऑर्डर करताना समस्या निर्माण झाली होती. 7 / 10 त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांसोबत ऑनलाइन डिलिव्हरीची सुरूवात केली. यामध्ये शेजारी असेलेले कॅफे आणि रेस्टराँ त्यांनी आपल्यासोबत जोडले. 8 / 10 दिपिंदर यांच्या पत्नी दिल्ली विद्यापीठात कामावर रूजू झाल्या, त्यावेळी दिपिंदर यांनी आपली पूर्णवेळ नोकरी सोडून पूर्ण वेळ उद्योजक म्हणून आपली सुरूवात केली. 9 / 10 सुरूवातीला या कंपनीत Sanjeev Bikhchandani यांनी गुंतवणूक केली होती. त्यानंतर या कंपनीचं नाव बदलून झोमॅटो करण्यात आलं. यानंतर कंपनीला टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, जॅक मा यांच्या अँट फायनॅन्शिअल आणि Sequoia Capital सारख्या जागतिक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळाली. 10 / 10 सध्या झोमॅटोचा व्यवसाय १० देशांमध्ये पसरला आहे. १०० शहरांमध्ये ही कंपनी फूड डिलिव्हरी करतो. कंपनीचा व्यवसाय तुर्कस्थान, ब्राझील, न्यूझीलंड आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्ये पसरला आहे. आणखी वाचा