शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 8:31 AM

1 / 8
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या सहसंस्थापक आणि चीफ पीपल ऑफिसर (सीपीओ) आकृति चोप्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने शुक्रवारी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. आकृती गेल्या १३ वर्षांपासून झोमॅटोशी जोडलेल्या होत्या. त्या यापूर्वी सीएफओ म्हणून कंपनीशी संबंधित होत्या. झोमॅटोमध्ये असताना आकृती चोप्रा यांनी लीगल, गव्हर्नन्स, रिस्क आणि कंप्लायंस सह विविध टीम हाताळल्या.
2 / 8
कंपनीच्या वेबसाईटवर आकृतीसाठी निरोपपत्रदेखील लिहिण्यात आलंय. यामध्ये कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी त्यांचे आभार मानलेत. 'आकृती यांनी अनेक अशक्य गोष्टी शक्य आणि सोप्या केल्या आहेत. त्या एक लीडर किंवा सहकाऱ्यांपेक्षाही अधिक आहेत,' असं दीपिंदर गोयल म्हणाले.
3 / 8
आकृती चोप्रा यांचं यश लाखो लोकांना प्रेरणा देतं. २०११ मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. परंतु अवघ्या १० वर्षातच आकृती या कंपनीच्या सह-संस्थापक बनल्या. त्यांना 'फूड-टेक क्वीन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखलं जातं. झोमॅटोपूर्वी, आकृती यांनी पीडब्ल्यूसीमध्ये चीफ फायनान्शिअल ऑफिसर म्हणूनही काम केलं आहे. त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
4 / 8
आकृती यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन (LSR) मधून शिक्षण घेतलंय. आपली स्थिर नोकरी सोडून झोमॅटोमध्ये सामील होण्याचा निर्णय पूर्णपणे त्यांचा होता. पालकांनीही त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. पण, आकृती यांनी त्यांना ती गोष्ट पटवून दिली.
5 / 8
झोमॅटोमध्ये असताना आकृती चोप्रा यांनी लीगल, गव्हर्नन्स, रिस्क आणि कम्प्लायसन्ससह निरनिराळ्या टीम्ससह काम केलं. २०११ मध्ये त्या कंपनीत सीनिअर मॅनेजर (फायनान्स आणि ऑपरेशन्स) म्हणून रुजू झाल्या. मग त्यांनी झपाट्यानं प्रगती केली. २०१२ मध्ये त्या व्हीपी (फायनान्स आणि ऑपरेशन्स) बनली. २०२० मध्ये, आकृती सीएफओच्या भूमिकेत आल्या. २०२१ मध्ये, त्यांची सह-संस्थापक आणि चीफ पिपल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
6 / 8
१९८८ मध्ये आकृती यांचा जन्म झाला. त्या सध्या गुरुग्राममध्ये राहतात. त्यांनी डीपीएस, आरके पुरम येथून शिक्षण घेतलं आणि एलएसआरमधून बी.कॉम पूर्ण केलं. झोमॅटोमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पीडब्ल्यूसीमध्ये तीन वर्षे काम केलं. २०२१ मध्ये Zomato चा आयपीओ आला तेव्हा आकृती यांच्या ESOP (कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन) शेअर्सचं मूल्य १४९ कोटी रुपये होतं. आकृती चोप्रा यांनी ब्लिंकिटचे संस्थापक अल्बिंदर ढींडसा यांच्याशी विवाह केलाय. नंतर झोमॅटोनं ही कंपनी विकत घेतली.
7 / 8
झोमॅटोमध्ये रुजू होण्यापूर्वी आकृती पीडब्ल्यूसीमध्ये टॅक्स अँड रेग्युलेटरी प्रॅक्टिस म्हणून काम करत होत्या. झोमॅटोत २०२१ मध्ये त्यांचा पगार १.६३ कोटी रुपये होता. झोमॅटोचा आयपीओ २०२१ मध्ये आला तेव्हा आकृती यांना मिळालेल्या ESOP (Employee Stock Ownership Plan) शेअर्सची किंमत जवळपास १४९ कोटी रुपये होती.
8 / 8
आकृती यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. २०१७ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या '३० अंडर ३०' यादीमध्ये त्यांचा समावेश होता. याशिवाय २०१८ मध्ये आकृती यांना 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला होता. आकृती चोप्रा या गुरुग्रामच्या रहिवासी आहेत.
टॅग्स :Zomatoझोमॅटोbusinessव्यवसाय