Zomato IPO Food delivery platform aims to raise Rupees 8250 crore money investment
Zomato IPO : Zomato आणतेय ८२५० कोटींचा IPO; गुंतवणूकदारांसाठी संधी, पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 3:32 PM1 / 15जर तुम्ही कोणत्या मोठ्या आयपीओच्या प्रतीक्षेत असात तर लवकरच एक मोठा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. 2 / 15फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे. झोमॅटोनं आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी सेबी (SEBI) कडे कागदपत्रे जमा केली आहेत. 3 / 15झोमॅटोनं जमा केलेल्या कागदपत्रांनुसार कंपनी आयपीओद्वारे ८२५० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत आहे. 4 / 15शेअर बाजारातील अनेक जण झोमॅटोच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहे. पाहूया या आयपीओमध्ये काय असेल.5 / 15झोमॅटोच्या या आयपीओमध्ये कंपनीकडून फ्रेश इश्यूसोबतच झोमॅटोमध्ये गुंतवणूक असलेल्या Info Edge (India) Limited कडून ऑफर फॉर सेल असेल.6 / 15आयपीओमध्ये ७,५०० कोटी रूपयांचा फ्रेश इश्यू आणि इन्फो एजकडून ठेवण्यात येणारा ७५० कोटी रूपयांचा ऑफर फॉर सेल असेल.7 / 15झोमॅटो आयपीओमध्ये आपल्या होल्डिंगच्या ७५० कोटी रूपयांच्या शेअरची विक्री OFS द्वारे विकण्यात येणार असल्याचं इन्फो एजनं सांगितलं.8 / 15सध्याच्या काळात झोमॅटोमध्ये इन्फो एजचा १९ टक्के हिस्सा आहे. 9 / 15कंपनीच्या संचालक मंडळानं OFS द्वारे झोमॅटोच्या आयपीओमध्ये ७५० कोटी रूपयांच्या शेअरच्या विक्रीसाठी मंजुरी दिली असल्याचं इन्फो एजनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितलं. 10 / 15सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर आयपीओची लाँच डेट ही शेअर मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असेल असं म्हटलं जात आहे. 11 / 15आयपीओतून मिळणारी रक्कम कंपनी आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी करेल असं झोमॅटोनं म्हटलं आहे. 12 / 15याशिवाय कॉर्पोरेट आवश्यकतांसाठीही या रकमेचा वापर केला जाईल. 13 / 15२०२० मध्ये पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल २४८६ कोटी रूपये होता.14 / 15परंतु या दरम्यान कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं. 15 / 15कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कंपनीला बसल्याचं सांगण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications