शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BOB Recruitment 2022: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 10:53 PM

1 / 8
बँकमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे आणि नोकरीचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. 'बँक ऑफ बडोदा'मध्ये ५८ पदांवर भरती निघाली आहे. उमेदवारांना २७ जानेवारी २०२२ पर्यंत आपला अर्ज दाखल करता येणार आहे.
2 / 8
नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी www.bankofbaroda.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज दाखल करावा लागेल. नोकरभरतीची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊयात..
3 / 8
हेड- वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्व्हेस्टमेंट अँड इन्श्युरन्स): भारत सरकार/ सरकारी संस्था/ एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयातून कोणत्याही विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. परीक्षेसाठीचे कॉल लेटर फक्त ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येतील. अधिक माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळाला भेट देता येईल.
4 / 8
नोकर भरतीची निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखत किंवा ग्रूप चर्चा किंवा इतर निवड पद्धतीनं केली जाईल. पुढील प्रक्रिया उमेदवाराच्या निवडीनुसार ठरवली जाईल.
5 / 8
उमेदवारांनी बँकेच्या www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. याची लिंक संकेतस्थळाच्या करिअर मेन्यूमध्ये उपलब्ध आहे. बँकेच्या संकेतस्थळावर डेबिट/क्रेडीट/इंटरनेट बँकिंग इत्यादींचा वापर करुन शुल्क भरता येईल.
6 / 8
ऑनलाइन अर्ज दाखल करताना उमेदवारांना आपला बायोडेटा अपलोड करावा लागणार आहे. उमेदवारांना त्यांचा स्कॅन फोटो, स्वाक्षरी आणि पात्रते संदर्भातील सर्व कागदपत्रं अपलोड करावे लागणार आहेत. 'सबमिट' पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी.
7 / 8
हेड- वेल्थ रणनितीकार (गुंतवणूक आणि विमा)- १ जागा, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा)- २८ जागा, गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक (पोर्टफोलिओ आणि डेटा विश्लेषण व संशोधन)- २ जागा, पोर्टफोलिओ रिसर्च अॅनालिस्ट- २ जागा.
8 / 8
एनआरआय वेल्थ प्रोडक्ट्स मॅनेजर- १ जागा, उत्पादन व्यवस्थापक (व्यापार आणि परदेशी मुद्रा)- १ जागा, व्यवसाय नियमन वरिष्ठ व्यवस्थापक- 1 जागा, प्रोडक्ट हेड प्रायव्हेट बँकिंग- १ जागा, ग्रूप सेल्स हेड- १ जागा, प्रायव्हेट बँकर रेडियन्स प्रायव्हेट- २० जागा.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी