CRPF Recruitment 2021 Vacancy for Paramedical Staff post in Central Reserve Police Force
CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी २४३९ जागांची भरती; मुलाखतीनं होणार निवड By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 1:16 PM1 / 8केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) देशातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती निघाली आहे. यात एकूण २४३९ जागांवर भरती केली जाणार आहे. 2 / 8इच्छुक उमेदवारांना crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. 3 / 8उमेदवारांच्या मुलाखती १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेतल्या आहेत. सीआरपीएफकडून करार तत्वावर विविध रुग्णांलयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी भरती राबवली जात आहे. 4 / 8इच्छुक उमेदवारांना ठरवून दिलेल्या वेळेतच मुलाखतीला उपस्थित राहण्याची काळजी बाळगावी लागणार आहे. यात उमेदवारांना त्यांची सर्व अधिकृत कागदपत्र सोबत घेऊन यावी लागणार आहेत. यात फोटो, पीपीओ, पदवी प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. 5 / 8आसाम रायफल्समध्ये १५६ जागा, सीमा सुरक्षा दलात ३६५, केंद्रीय राखीव सुरक्षा पदलात १५३७, भारत-तिबेटियन सीमा पोलीस १३० जागा आणि सेवा निवड बोर्डात २५१ जागांवर भरती केली जाणार आहे. 6 / 8उपरोक्त पदांसाठी सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. यात उमेदवाराचं वय ६२ वर्षांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. 7 / 8केंद्रीय राखीव पोलीस दलातील पदांवरील भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 8 / 8त्यामुळे या पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करून १३ ते १५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मुलाखतीसाठी तयार राहावं लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications