शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' आहेत जगातील सर्वात धोकादायक नोकऱ्या; काम करताना जीव जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 9:42 PM

1 / 10
अंतराळवीर- अंतराळवीर होण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागते. मात्र अंतराळात गेल्यानंतरचं जीवन सुसह्य नसतं. यानात काही बिघाड झाल्यास जीवदेखील जाऊ शकतो.
2 / 10
खनिज तेल काढणारे कर्मचारी- खनिज तेलाच्या विहिरींमध्ये काम करणारे कर्मचारी पृथ्वीच्या पोटात काम करतात. या ठिकाणी सतत दुर्घटना होण्याचा धोका असतो.
3 / 10
माऊंटन गाईड- डोंगर, पर्वतांवर चढाई करताना माऊंटन गाईड महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र इतरांची चढाई यशस्वी व्हावी, यासाठी मेहनत घेणाऱ्या माऊंटन गाईड्सना मात्र जीव पणाला लावावा लागतो.
4 / 10
अग्निशमन दलाचे कर्मचारी- आपण जराशी आग पाहून घाबरुन जातो. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी भीषण आग विझवण्यासाठीही स्वत:ला झोकून देतात. अनेकदा कर्तव्य बजावताना त्यांना जीवदेखील गमवावा लागतो.
5 / 10
अंगरक्षक- अंगरक्षकांचं अनेकांना आकर्षक वाटतं. मात्र हे काम अतिशय धोकादायक असतं. व्हीव्हीआयपींची सुरक्षा करताना अतिशय सतर्क राहावं लागतं. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचं संरक्षण करावं लागतं.
6 / 10
स्टंटमॅन- चित्रपटातील स्टंट करण्याचं काम स्टंटमॅन करतात. मात्र एडिटिंगमुळे चित्रपटाचे हिरोच ते करत असल्याचं वाटून जातं. मात्र हा धोका पत्करुनही स्टंटमॅनला फार प्रसिद्धी मिळत नाही.
7 / 10
बचाव दलाचे कर्मचारी- नैसर्गिक आपत्ती आल्यावर बचाव दलाचे कर्मचारी लोकांना वाचवण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करतात. अनेकदा लोकांना वाचवताना त्यांना स्वत:च्या जीवाची बाजी लावावी लागते.
8 / 10
वैमानिक- वैमानिकांचं काम अतिशय जोखमीचं असतं. त्यांच्यावर अनेक प्रवाशांची जबाबदारी असते. त्यांची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते.
9 / 10
बांधकाम कर्मचारी- लोकांची स्वप्न साकार करण्याचं काम बांधकाम कर्मचारी करतात. मात्र लोकांचं भविष्य साकारताना ते स्वत:चा वर्तमान धोक्यात घालतात.
10 / 10
संरक्षण दलाचे जवान- संरक्षण दलाचे जवान देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावतात. देशासाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान देण्याचीही त्यांची तयारी असते.
टॅग्स :jobनोकरी