शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Foreign Study: कॅनडामध्ये शिक्षणासह नोकरीची संधी, दरमहा मिळणार ‘इतकी’ सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 3:14 PM

1 / 6
परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यार्थ्यांना शिकत असताना कमावण्याची संधी देण्याचा निर्णय कॅनडानं घेतला आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अभ्यासादरम्यान कमाई करून ते अभ्यासावरील खर्च भागवू शकतात. कॅनडा सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना कमाईची ही संधी देत ​​आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कामाचा अनुभव घेता येईल, जो त्यांच्या पुढील करिअरसाठी खूप उपयुक्त ठरेल. विशेष म्हणजे ही कमाईची संधी कोणत्याही विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रापुरती मर्यादित नाही.
2 / 6
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान विज्ञान, व्यवसाय, प्रशासन, आयटी, वित्त यासह इतर अनेक क्षेत्रात कामाच्या संधी मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पैसे कमावण्याचे पर्याय उपलब्ध होतील. विशेष म्हणजे कंपन्या विद्यार्थ्यांना ज्या नोकऱ्या देणार आहेत, त्या ठिकाणी त्यांना आकर्षक वेतनही मिळणार आहे.
3 / 6
कॅनडा सरकार विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींमध्ये कॅनडियन लोक आणि कायमस्वरूपी रहिवासी यांना प्राधान्य देईल. परंतु, परदेशी विद्यार्थ्यांसाठीही या नोकऱ्यांचे दरवाजे खुले असतील. यासाठी विद्यार्थ्यांनी कॅनेडियन हायस्कूल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला ज्या प्रांतात किंवा क्षेत्रात काम करायचे आहे त्यानुसार त्याचे वयही असणे आवश्यक आहे.
4 / 6
दिव्यांग विद्यार्थ्यांनाही कॅनडा सरकारच्या या रोजगार संधीचा लाभ घेता येणार आहे. परंतु अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शेक्षणिक संस्थांमधून फुल टाईमचं स्टेटस मिळालेलं असणं अनिवार्य असेल अशीही अट आहे. विद्यार्थ्यांना पार्ट टाईम आणि फुल टाईम नोकरीच्या दोन्ही संधी उपलब्ध असतील.
5 / 6
कॅनडाचा विद्यार्थ्यांचा डेटाबेस वर्षभर खुला असेल. सर्व विभाग आणि संस्था या डेटाबेसचा वापर करू शकतील. विद्यार्थ्यांना सरकारी विभागात काम करण्याची संधीही मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये महिला, अल्पसंख्याक किंवा दिव्यांग आहे का नाही याचा उल्लेख करावा लागेल. याचे कारण त्यांच्यासाठी विशेष प्रकारची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. अर्जामध्ये वरील माहिती असल्यास, विद्यार्थी त्या विशिष्ट पदांसाठी देखील पात्र होईल.
6 / 6
सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तासासाठी १६ कॅनडियन डॉलर्स दिले जातील. रूपयांमध्ये ते जवळपास १००० हजार होतात. तर पोस्ट सेकंडरी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तासासाठी १६ कॅनडियन डॉलर्स ते ३४ कॅनडियन डॉलर्स इतकं वेतन असेल. अशा प्रकारे विद्यार्थी दररोज सहा तास काम करून १२ हजार रूपये कमवू शकतात. आठवड्यात सहा दिवस काम करून ते ७२ हजारांपर्यंत वेतन मिळवू शकतात.
टॅग्स :Canadaकॅनडाjobनोकरी