शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुडन्यूज! तब्बल १४.५ लाख नोकऱ्या मिळणार, भारतीयांसाठी मोठी संधी; नोकरी कुठे आणि कशी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:19 AM

1 / 7
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कॅनडाने आगामी तीन वर्षांत १४.५ लाख विदेशी नागरिकांना नोकरी देण्याची तयारी केली आहे. तेथे अपुरे मनुष्यबळ असल्याने सरकार विदेशातील तरुणांसाठी देशाचे दरवाजे उघडणार आहे.
2 / 7
कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री शॉन फ्रेसर यांनी यासंदर्भात माहिती दिली. कर्मचारी टंचाईमुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे २०२३-२५ या तीन वर्षांसाठी नवीन इमिग्रेशन योजना तयार करण्यात आली आहे.
3 / 7
योजनेनुसार, १४.५ लाख विदेशी नागरिकांना कॅनडात नोकरी दिली जाईल. २ लाख लोकांनी मार्चपासून नोकरी सोडली आहे. नोकरी, वेतनासोबत कायमस्वरूपी नागरिकत्वही मिळणार आहे.
4 / 7
व्यवसाय सल्ला संस्था आरएसएम कॅनडाच्या अहवालानुसार, कोरोनामुळे लोकांनी नोकऱ्या सोडणे, देशाचा घटता जननदर आणि वृद्ध होणारी लोकसंख्या यामुळे कॅनडास काम करणारे मनुष्यबळ कमी पडत आहे.
5 / 7
सध्या कॅनडाचा जननदर प्रतिमहिला १.४ मुले इतका घसरला आहे. २०३० पर्यंत कॅनडाची एकचतुर्थांश लोकसंख्या म्हणजेच ९० लाख लोक निवृत्तीच्या वयाला पोहोचतील. कॅनडात सध्या १४ लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. गेल्या वर्षी १.२७ लाख लोकांना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळाले होते.
6 / 7
कॅनडामध्ये एक्स्प्रेस एंट्रीद्वारे सहज प्रवेश मिळू शकतो. अमेरिकेच्या एच१-बी व्हीसापेक्षा ही प्रक्रिया खूप सोयीस्कर आहे. एक्स्प्रेस एंट्रीद्वारे कुशल मनुष्यबळ निवडले जाते. याअंतर्गत एक चाचणी घेतली जाते. निवडलेल्या तरुणांना जोडीदारासह आई-वडिल आणि मुलांनाही व्हीसा सहज मिळतो.
7 / 7
जून-जुलै २०२२ मध्ये कॅनडात कोविड-१९ ची सातवी लाट आली. मार्चपासून आतापर्यंत दोन लाख लोकांनी नोकरी सोडली आहे. मागील १ वर्षात मनुष्यबळाच्या टंचाईने कॅनडा अर्थव्यवस्थेला एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या लोकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे तेथील कंपन्यांना तातडीने मनुष्यबळाची गरज आहे.
टॅग्स :jobनोकरीCanadaकॅनडा