indian railways recruitment 2021 apprentice job application last date and procedure
Railway Jobs : ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 3:08 PM1 / 7भारतीय रेल्वेत अनेक पदांवर मोठी नोकरभरती निघाली आहे. एकूण १३० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. 2 / 7विशेष म्हणजे इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण केलेल्यांनाही अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. 3 / 7दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान ५० टक्के गुण असले पाहिजेत. यासोबतच उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं गरजेचं आहे. 4 / 7अॅप्रेंटिससाठी उमेदवाराचं वय १५ ते २४ दरम्यान असणं आवश्यक आहे. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेच्या अटीत सूट देण्यात आली आहे. 5 / 7रेल्वेतील अॅप्रेंटिस नोकरीसाठी त्याच्या वैयक्तीक माहितेचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. 6 / 7पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी, इयत्ता १० वीचं उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र गरजेचं आहे. 7 / 7उमेदवारांची निवड ही त्यांच्या मेरीटवरुन केली जाणार आहे. अर्जाचे शुल्क १०० रुपये इतके असून यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यासोबतच दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications