Indian Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७९१४ पदांसाठी मोठी भरती; पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 08:21 IST
1 / 8भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेने एकूण 7,914 पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 2 / 8साऊथ सेंट्रल रेल्वे (SCR), साऊथ इस्टर्न रेल्वे (SER) आणि नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या (NWR) रिक्रुटमेंट सेलने 2023 मध्ये संबंधित विभागात भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या सर्व पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.3 / 8साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये 4,103 जागांसाठी, तर साऊथ इस्टर्न रेल्वेमध्ये 2,026 आणि नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये 1,785 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे अप्रेंटिस भर्ती 2023 साठी संबंधित झोनच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 4 / 8ऑनलाइन अर्जाची माहिती 30 डिसेंबर रोजीच देण्यात आली आहे. उमेदवारांना scr.indianrailways.gov.in, rrcser.co.in आणि rrcjaipur.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.5 / 8अधिकृत अधिसूचनेनुसार, साऊथ झोनमध्ये अपरेंटिस पदासाठी उमेदवारांच्या 4,103 जागा रिक्त आहेत. हा प्रदेश तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांना जोडतो. साऊथ इस्टर्न झोनमध्ये अपरेंटिस पदांसाठी 2,026 जागा रिक्त आहेत. त्याच वेळी, नॉर्थ वेस्टर्न झोनमध्ये 1,785 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.6 / 8कोण करू शकतं अर्ज - उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डतून 50 टक्के गुणांसह मॅट्रिक (10+2 सिस्टममध्ये 10 वी) असणं आणि आयटीआय उत्तीर्ण सर्टिफिकेट (ज्या ट्रेडमध्ये अपरेंटिस करायची आहे) असणं अनिवार्य आहे.7 / 8रेल्वेच्या जाहिरातीनुसार अर्जदारानं 1 जानेवारी 2023 रोजी आपल्या वयाची 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत, तसंच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 वर्षांपेक्षा अधिक असू नये. आरक्षित वर्गांमधील उमेदवारांसाठी नियमांप्रमाणे सूट देण्यात येणार आहे.8 / 8नोटीसनुसार उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे. 10 वीच्या परीक्षेत उमेदवारांना किमान 50 टक्के गुण आणि आयआयटी ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही निवड केली जाईल. 10 जानेवारी पासून उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच 10 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.