1 / 6भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत सीएमपी, नर्सिंग सिस्टर आणि हॉस्पिटल अटेंडंटसाठीच्या पदांची भरती होणार आहे. पश्चिम रेल्वे पँरामेडिकल रिक्रूटमेंट २०२१ साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना ११ मेपर्यंत अॉनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांची निवड ही अॉनलाइन मुलाखतींच्या माध्यमातून होणार आहे.2 / 6ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात ७ मे २०२१ पासून झाली आहे.ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख ही ११ मे २०२१ आहे. तर उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती ह्या १३ मे रोजी होतील3 / 6पश्चिम रेल्वे पँरामेडिकल भरतीमधील पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. सीएमपी -९ पदे, नर्सिंग सिस्टर - ८ पदे, हॉस्पिटल अटेंडंट - १० पदे.4 / 6सीएमपी - सीएमपी पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एमबीबीएस(एमसीआय मान्यताप्राप्त)ची पदवी असणे अनिवार्य आहे. नर्सिंग सिस्टर - यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे नोंदणीकृत नर्सचे प्रमाणपत्र असावे. तसेच जनरल नर्सिंगमध्ये तीन वर्षांचा कोर्स किंवा बीएससीची पदवी असावी. हॉस्पिटल अटेंडंट - या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोविड रुग्णालयात काम केल्याचा अनुभव असावा. तसेच त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 5 / 6या पदांसाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. सीएमपीसाठी तीन वर्षे, नर्सिंग सिस्टरसाठी १८ ते ३३ वर्षे आणि हॉस्पिटल अटेंडंटसाठीही १८ ते 33 वर्षे ही वयोमर्यादा आहे.6 / 6निवड झालेल्यांना मिळेल एवढे वेतन सीएमपी पदासाठी निवढ झालेल्यांना ७५ हजार, नर्सिंग सिस्टरसाठी ४४ हजार ९००रुपये आणि हॉस्पिटल अटेंडंटसाठीच्या १८ हजार रुपये प्रति महिना आणि भत्ता अशा सुविधांचा समावेश आहे.