शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जाणार? करिअरवर संकट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 9:03 AM

1 / 9
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 9
रशियाने युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले असून, युक्रेनही रशियाला प्रत्युत्तर देत आहे. यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली असून, आता अणुयुद्ध होतेय की काय अशी भीती संपूर्ण जगभरात व्यक्त केली जात आहे.
3 / 9
यातच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे सुरू असलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ११५० हून अधिक लोकांना भारतात सुखरुप परत आणण्यात आले आहे. अन्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत.
4 / 9
भारतीय दूतावासानुसार युद्धाआधी युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी राहात होते. हे विद्यार्थी तेथे राहून शिक्षण घेत होते. यापैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते.
5 / 9
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी सहा वर्षात २० ते २५ लाख रुपये खर्च येतो. युद्धामुळे आता या विद्यार्थ्यांचे करिअर संकटात असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी तेथे या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते.
6 / 9
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षानंतर आता विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून परतावे लागत आहे. काही विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. आता त्यांच्या समोर वेगळेच संकट उभे आहे. त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
7 / 9
युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी प्रमुख १८ विद्यापीठे आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर या विद्यापीठांचे काय होणार, याचा नेमका अंदाज तूर्त कोणालाच नाही. ज्या पद्धतीने युद्धामुळे युक्रेनमधील शहरे उद्धवस्त होत आहेत, ते पाहता तेथे लगेच सर्व पूर्वपदावर येणे कठीण आहे.
8 / 9
युक्रेनमध्ये सहा वर्षांचा एमबीबीएस कोर्स पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याला सरासरी २० ते २५ लाख रुपये शुल्क भरावे लागते. काही विद्यार्थ्यांची सोय विद्यापीठांच्या वसतिगृहात होते, तर काहींना बाहेर राहावे लागते.
9 / 9
या सर्व विद्यार्थ्यांवर तूर्त तर मायदेशी परतण्याचे मोठे आव्हान आहे. त्यानंतर त्यांच्यासमोर अर्धवट शिक्षणाचे काय करायचे, ते कुठे कसे पूर्ण करायचे, की परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहायची, किती वेळ वाट पाहायची असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनStudentविद्यार्थी