sbi clerk recruitment 2021 online apply for junior posts at sbi co in check vacancy details
SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत ५,२३७ जागांसाठी मोठी भरती; अर्जासाठी उरले अखेरचे काही दिवस By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:12 PM1 / 15SBI Clerk Recruitment 2021: जर तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय स्टेट बँकेनं मोठी भरती प्रक्रिया सुर केली आहे. 2 / 15स्टेट बँकेनं क्लर्क भरती २०२१ (SBI Clerk Recruitment 2021) साठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. 3 / 15यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे. योग्य उमेदवार स्टेट बँकेची अधिकृत बेवसाईट sbi.co.in च्या माध्यमातून ज्युनिअर असोसिएट्स पदासाठी अर्ज करू शकता.4 / 15स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क भरती २०२१ च्या माध्यमातून ज्युनिअर असोसिएट्सच्या एकून ५२३७ पदं भरणार आहे.5 / 15या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे निश्चित करण्यात आली आहे. 6 / 15या भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी स्टेट बँकेच्या वेबसाईटवर माहिती पाहता येईल. 7 / 15यासाठी अर्ज जमा करण्याची तारीख १७ मार्च निश्चित करण्यात आली आहे. तर २६ मार्च २०२१ रोजी प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटरसाठी निश्चित करण्यात आली आहे.8 / 15जून महिन्यात प्रिलिमिनरी एक्झाम होणार असून ३१ जुलै रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 9 / 15१ एप्रिल २०२१ रोजी उमेदवाराचं वय कमीतकमी २ वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असणं आवश्यक आहे.10 / 15 याशिवाय सरकारच्या सूचनांनुसार आरक्षित श्रेणीसाठी उमेदवारांना सूट मिळणार आहे. 11 / 15निवड प्रक्रियेत सुरूवातीला एक परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. तसंच यासोबत ऑप्टेड स्थानिक भाषेचीही चाचणी घेण्यात येणार आहे. 12 / 15१०० गुणांची सुरूवातीची परीक्षा ऑनलाइन ऑबजेक्टिव्ह असेल. एका तासाच्या परीक्षेची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. 13 / 15तीन भागांमध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमतेची परीक्षा घेतली जाणार आहे. 14 / 15खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी ७५० रूपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी ७५० रूपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. 15 / 15याशिवाय एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्सएस, डीएक्सएस श्रेणीशी संबंधित उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications