SBI Recruitment 2022: SBI मध्ये बंपर नोकर भरती, ६० लाख रुपये वार्षिक पॅकेज! अर्ज कसा कराल? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 9:38 AM
1 / 7 भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. 2 / 7 SBI SCO भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदरांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलं जाईल. पगार, जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती आपण जाणून घेऊयात. 3 / 7 डेप्युटी मॅनेजर पदासाठी १६ जागांवर भरती होणार आहे. तर सीनिअर एग्झिक्युटिव्ह १७ जागा, एग्झिक्यूटीव्ह २ जागा, एग्झिक्युटिव्ह २ जागा, सीनिअर स्पेशनल एग्झिक्युटीव्ह १ जागा, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर १ जागा, असिस्टंट डेटा ऑफिसर १ जागा, सीनिअर क्रेडिट स्पेशालिस्ट १६ जागा आणि रिक्त जागांची संख्या ५४ इतकी आहे. 4 / 7 जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी विभागासाठी उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेवादारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. 5 / 7 सर्वात आधी एसबीआय करिअरच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in/web/careers वर भेट द्या. होमपेजवर 'RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS' या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. यात रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि फी जमा करा. सबमिट बटणावर क्लिक करा आणि तुमच्या कर्न्फरमेशनसाठी पावतीची प्रिंटआऊट घेऊन ठेवा. 6 / 7 डेप्युटी मॅनेजर पदासाठी ६० लाख रुपये (वार्षिक पॅकेज), सीनिअर एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २४ लाख रुपये (वार्षिक पॅकेज), एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २० लाख रुपये (वार्षिक पॅकेज), सीनिअर स्पेशल एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २७ लाख रुपये (वार्षिक पॅकेज) 7 / 7 डेटा प्रोटेक्शन ऑफीसरसाठी ६० लाख रुपये (CTC), असिस्टंट डेटा ऑफीसरसाठी ३५ लाख रुपये (CTC) इतका पगार असणार आहे. आणखी वाचा