शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काबाडकष्ट करुन शेतकऱ्यानं मुलाला बनवलं IAS अधिकारी; सर्व गाव म्हणतंय आता..लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 2:41 PM

1 / 10
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना देशाचा अन्नदाता म्हटलं जातं. मात्र आजही शेतकऱ्यांना गरिबीची कळ सोसावी लागते. शेतकरी काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना शिक्षण देतो. अशाच एका शेतकरी बापाने रात्रंदिवस शेतात घाम गाळला आणि मुलाला शिकविले.
2 / 10
मुलगा आपलं नाव करेल हीच स्वप्न बाप पाहत होता. मुलानेही वडिलांचे स्वप्न कधी तुटू दिले नाही. भारतीय प्रशासकीय सेवेत त्याने उत्तुंग यश प्राप्त करत प्रथम स्थान मिळविले.
3 / 10
सध्या लॉकडाऊन काळात सगळेच जण घरात बसले आहेत. प्रत्येकाला आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळत आहे. आज एका आयएएसच्या यशस्वी गाथा ऐकून तुमच्यातही स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द निर्माण होईल.
4 / 10
उत्तर प्रदेश राज्यातील टॉपर अनुभव सिंह यांचा जन्म अलाहाबादजवळील दासेर या एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील धनंजय सिंह हे एक शेतकरी आहेत आणि आई सुषमा सिंग ही सरकारी शाळेत क्लार्क आहे. अनुभवच्या मोठ्या बहिणीने विज्ञान शाखेत पदवी मिळविली आहे.
5 / 10
अनुभवने इयत्ता आठवीपर्यंत गावात शिक्षण घेतले आणि अलाहाबादच्या शिवपुरी येथील बीबीसी इंटर कॉलेजमधून पुढचं शिक्षण पूर्ण केले. अकरावीपासून अनुभव आयआयटीची तयारी करत होता. त्यानंतर त्याला आयआयटी रुडकीमध्ये प्रवेश मिळाला.
6 / 10
अनुभवची आई सुषमा सिंह जवळजवळ 12 वर्षे अलाहाबादमध्ये त्याच्याबरोबर राहिली. आणि त्यांच्या अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. अनुभवची आई अभिमानाने सांगते की तिच्या मुलाला पुस्तके आणि अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही छंद नव्हता. अनुभवाचं यश हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असल्याचं वडील मानतात. त्यांचा मुलगा लहानपणापासूनच करिअरबाबत जबाबदार आणि गंभीर होता असं त्यांनी सांगितले.
7 / 10
अनुभव आपल्या यशाचं श्रेय कुटुंबाला आणि मित्रांना देतो, आयआयटी रुडकीमधून अभियांत्रिकी घेतल्यानंतर त्याची भारतीय महसूल सेवा विभागासाठी त्याची निवड झाली. यात प्रशिक्षण घेताना अनुभवने प्रशासकीय सेवेची तयारी सुरू ठेवली. त्याच्या परिश्रम आणि संघर्षावर त्याचा पूर्ण विश्वास होता, म्हणूनच त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
8 / 10
अनुभव स्वभावाने गंभीर आणि शांत आहे. प्रशासकीय सेवेची तयारी एखाद्याच्या दबावाखाली न करता मनात प्रबळ इच्छा होती म्हणून केल्याचं त्याने सांगितले.
9 / 10
2017 मध्ये, यूपीएससीमध्ये अनुभवने 8 वा क्रमांक मिळवून विक्रम रचला. तो अधिकारी झाल्यानंतर कुटुंब आणि गावात आनंद साजरा केला. गावातील सगळ्या लोकांनी बापाचं कौतुक केले. जेव्हा तो अधिकारी म्हणून गावात परतला तेव्हा त्याच्या वडिलांची छाती गर्वाने फुगून आली.
10 / 10
दोन ते अडीच वर्षे कठोर परिश्रम आणि विषयांबद्दल मित्रांशी सतत चर्चा करणे यातून आपलं एक धोरण बनवू शकते. परीक्षेच्या विषयांची पुस्तके सतत वाचून तुम्ही यशाजवळ जाऊ शकता. खेड्यातल्या या मुलाने हे यश मिळवून हे सिद्ध केले की मेहनतीने यशाचे शिखर गाठू शकता असं अनुभवने सांगितले.
टॅग्स :examपरीक्षा