success story of doctor renu raj surgeon turned ias officer upsc 2 rank first attempt
सर्जन असलेल्या रेणू राज पहिल्याच प्रयत्नात झाल्या आयएएस अधिकारी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 12:28 PM1 / 7अनेक डॉक्टर आणि अभियंते आपले सुस्थापित करिअर सोडून यूपीएससी(UPSC) नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशाच एक आयएस (IAS) अधिकारी आहेत, ज्या पेशाने सर्जन होत्या. सर्जन म्हणून काम करत असताना त्यांनी काही महिने तयारी करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये अव्वल ठरल्या. 2 / 7आयएएस (IAS) रेणू राज असे त्यांचे नाव आहे. रेणू राज या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण केरळमधील कोयट्टम येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. इंटरमिजिएटनंतर त्यांनी कोयट्टम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. यानंतर त्या सर्जन झाल्या.3 / 7सर्जन म्हणून काम करत असताना त्यांनी २०१३ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. काही महिन्यांच्या तयारीनंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. केरळ कॅडरच्या रेणू राज यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक मिळवला होता. 4 / 7देशातील सर्वात कार्यक्षम आएएस अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. रेणू राज यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील निवृत्त कर्मचारी आणि आई गृहिणी आहेत. रेणू राज यांच्या दोन बहिणीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. रेणू राज यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करताना सर्जन म्हणून काम सुरू ठेवले. 5 / 7डॉ. रेणू राज यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांना लोकांसाठी अधिकाधिक काम करायचे आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणून त्या ५० ते १०० रुग्णांना मदत करता येऊ शकते. पण आयएएस अधिकारी बनून एका निर्णयाने हजारो लोकांना मदत केली जाऊ शकते, असा विचार त्यांनी केला. 6 / 7यानंतर डॉ. रेणू राज यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आयएएस झाल्यानंतर रेणू राज यांनी यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी टिप्स शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, डॉक्टर म्हणून काम करताना त्या दररोज तीन ते सहा तास अभ्यास करत होत्या. 7 / 7हे वेळापत्रक त्यांनी सहा ते सात महिने फॉलो केले. एप्रिल २०२२ मध्ये रेणू राज यांनी आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटरामनशी लग्न केले. या जोडप्याने आपले लग्न साधेपणाने साजरे केले. आणखी वाचा Subscribe to Notifications