शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिव्यागांची दमदार कामगिरी; वारा-पाऊस झेलत कठीण गोरखगडची मोहीम केली फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 6:53 PM

1 / 8
पैठण ( औरंगाबाद ) : घनदाट कारवी कर्दळीच्या जंगलातून सहा दिव्यांगांनी शुक्रवारी सायंकाळी गोरखगड किल्ल्यावर चढाईस सुरुवात केली.
2 / 8
खाच-खळगे, निसरड्या वाटा, ओढे-नाले, डोंगर-दऱ्या, झाडी झुडपातून एकमेकांना आधार देत दिव्यांग एक एक टप्पा पार करत होते, काळ्याकुट्ट अंधारात, मोबाईल बॅटरीच्या उजेडात तर कधीकधी धो-धो बरसणाऱ्या पावसाचा सामना करत रात्री बारा वाजता किल्ला सर करून दिव्यांगांनी मोहीम फत्ते केली.
3 / 8
मुरबाड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात असलेला ऐतिहासिक गोरखगड किल्ला कठीण व दुर्गम प्रकारात मोडतो. हा किल्ला २१३० फूट उंचीचा असून पैठण येथील शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बाधवासाठी साहसी भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.
4 / 8
शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ते महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर दिव्यांगांसाठी साहसी भटकंती मोहिमेचे आयोजन करतात.
5 / 8
यंदा प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांगांची गोरखगड किल्ल्यावर भटकंती मोहिम शुक्रवारी ( दि. ३० ) रोजी सुरु झाली. मोहिमेतील सहा दिव्यांगा पैकी चार दिव्यांग हे पोलिओग्रस्त कुबड्या व कॅलिफर्स वापरणारे होते.
6 / 8
या मोहिमेत भिवंडी येथील महिला दिव्यांग मनिषा पाटील यांच्यासह शिवाजी गाडे ( पैठण), कचरू चांभारे (बीड), जनार्दन पानमंद (रायगड), दत्ताभाऊ साळकर (औरंगाबाद) व मच्छिंद्र थोरात (पुणे) या दिव्यांगांनी सहभाग घेतला.
7 / 8
रात्री एकमेकांना आधार देत दिव्यांग बांधवांनी गोरखगडावर चढाई केली. या चढाईत कुणालाही दुखापत झाली नाही असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सांगितले.
8 / 8
मध्यरात्री किल्ला सर केल्यानंतर रात्रीचा मुक्काम गडावरील गुहेत करून ३१ जुलै रोजी गोरखगडावर भटकंती करण्यात आल्याचे शिवाजी गाडे यांनी सांगितले.
टॅग्स :Trekkingट्रेकिंगAurangabadऔरंगाबाद