शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 9:46 AM

1 / 14
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून, या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बसत आहे.
2 / 14
गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.
3 / 14
त्यात, सोमवारी मराठवाड्यासाठी अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे.
4 / 14
बीड जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आला असून नदीकाठावरील वाकडी गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे, येथील तीन घरांतील गावकऱ्यांना घराच्या छतावर जाऊन स्वत:चा बचाव करावा लागला आहे. मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
5 / 14
बीड जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.२७) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे.
6 / 14
मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
7 / 14
चाळीसगावः घाटरोडवरील तितूर नदीचे उधाणलेला चेहरा..
8 / 14
अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी गावात घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले.
9 / 14
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
10 / 14
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली.
11 / 14
पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे बस कलंडली आणि नाल्यात वाहून गेली. उमरखेड वरून पुसदकडे ही बस जात होती, या बसमधून चालक आणि वाहकासह एकूण 5प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
12 / 14
चाळीसगावः पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा दर्गाह
13 / 14
पाचोरा जि. जळगाव येथे बहुळा नदीला पूर आला आहे.
14 / 14
जळगाव - गिरणा नदीला आलेला पूर. आव्हाणे, ता.जळगावजवळील पूरस्थिती.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरMarathwadaमराठवाडाriverनदीCyclone Gulabगुलाब चक्रिवादळ