What is hidden in the Bibi-ka-maqbara area? Open the base of the bathroom, toilet in the excavation
बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 6:18 PM1 / 5भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून मकबरासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात स्ट्रेन्चची आखणी १४ सप्टेंबरला करून उत्खननाचा शुभारंभ करण्यात आला. 2 / 5समोरच्या भागात दोन स्ट्रेन्चमध्ये चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटवला गेल्याने विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले आहेत. पावसामुळे कधी खोदकाम होते कधी थांबत आहे. या सापडलेल्या बांधकामांना लागून पुढे काय अवशेष सापडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.3 / 5२००५ ते २००९ दरम्यान असलेल्या अधीक्षकांनी मकबऱ्यासमोरच्या जागेत काही पुरातत्व अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, या परिसरातील अतिक्रमणासह इतर कारणांनी ते काम रेंगाळले होते. नुकतेच मनपाने येथील अतिक्रमण हटवले.4 / 5भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने पर्यटकांना सोयी सुविधांसाठी मकबरा परिसरात सुरक्षा भिंत, पार्किंग परिसराचा विकास करण्यासाठी परवानगी मागितली होती. ते तीन लाखांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. त्यासोबतच पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार या परिसरात मकबऱ्याच्या संदर्भात आणखी काही अवशेष सापडतात का यासाठी उत्खनन सुरू आहे. उत्खननात आढळून आलेले स्ट्रक्चरचे संवर्धन करून पुढील संरक्षक भिंतीचे काम केले जाणार आहे. असे पुरातत्व सर्वेक्षणकडून सांगण्यात आले.5 / 5एस्क्लेव्हेशन, सायंटिफीक क्लिअरन्स, डेब्रीज क्लिअरन्स (मलबा साफ करणे) अशी उत्खननाची वर्गवारी असते. मकबरा परिसरात संरक्षक भिंतीसाठी परवानगी मिळाली असून, सर्कलस्तरावर ४० मीटर बाय ४० मीटर मलबा हटविण्याचे काम हाती घेतले आहे. दररोज ४ ते दहा लोक काम करत आहेत. आतापर्यंत स्नानगृह, स्वच्छतागृहाचा पाया सापडला आहे. हे स्ट्रक्चर पुढे वाढत गेल्यास सायंटिफीक क्लिअरन्स करावे लागेल. त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च आता सांगणे अशक्य आहे. - डॉ. मिनल कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद विभाग आणखी वाचा Subscribe to Notifications