स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा!

क्रिकेटपटूंचे जगभरात लाखो चाहते असतात.. त्यांचं स्टायलिस्ट जगणं, त्याची प्रत्येक गोष्ट चाहते फॉलो करतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते.

त्यामुळेच क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांच्या पत्नींचाही एक फॅन फॉलोअर्स तयार होतो. पण, केवळ क्रिकेटपटूची पत्नी म्हणूनच नव्हे, तर त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे.

अशाच एका क्रिकेटपटूच्या पत्नीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

स्विमींग, वॉटल पोलो खेळाडू असलेली क्रिकेटपटूची पत्नी व्यावसायानं वकील आहे आणि न्यायालयात तिच्या युक्तीवादासमोर भल्याभल्यांची बोलती बंद होते.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ जसा क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हतबल करतो, तसेच त्याची पत्नी डॅनी विलिस न्यायालयात प्रतिस्पर्धींना गप्प करते.

2018मध्ये स्मिथ आणि डॅनी यांनी विवाह केला. 2011मध्ये या दोघांची पहिली भेट झाली. तेव्हा डॅनी वकिली शिकत होती.

वकील असली तरी डॅनीला खेळाचीही आवड आहे. तिनं स्विमिंग आणि वॉटर पोलो खेळातही नैपुण्य मिळवले आहे.

17 जानेवारी 1991मध्ये सिडनी येथे डॅनीचा जन्म. तिला फॅशनचीही आवड आहे आणि सोशल मीडियावरील तिच्या फोटोतून ती आवड दिसून येते.

2017मध्ये स्मिथनं तिला न्यूयॉर्कच्या टॉप ऑफ रॉकवर प्रपोज केलं होतं आणि त्यानंतर काही महिन्यात दोघांनी साखरपुडा केला.