PHOTOS : समलिंगी विवाह! इंग्लंडच्या फलंदाजाची ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं 'प्रेमात' काढली विकेट

Amy Jones Piepa Cleary Engaged : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंनी समलिंगी जोडीदार निवडला.

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक खेळाडू एमी जोन्स आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पीपी क्लेरी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

या दोन्ही महिला खेळाडूंचा साखरपुडा झाला असून, त्याची झलक त्यांनी शेअर केली आहे. क्रिकेट वर्तुळात या समलिंगी जोडप्याची चर्चा रंगली आहे.

क्लेरी आणि एमी यांची पहिली भेट महिलांच्या बीग बॅश लीगदरम्यान झाली होती. त्या दोघीही पर्थ स्कोचर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होत्या. यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि आता त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला.

एमी जोन्सने २०१९ मध्ये इंग्लंडकडून कसोटीमध्ये पदार्पण केले. यानंतर ती वन डे आणि कसोटी संघाचा भाग झाली.

तिने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तिने ९१ वन डे सामन्यांमध्ये १९५१ धावा झाल्या आहेत. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

इंग्लंडची स्टार खेळाडू एमीची वन डेमधील सर्वोत्तम धावसंख्या ही ९४ अशी धावा आहे. तिने १०७ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये इंग्लिश संघाचे प्रतिनिधित्व केले.

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये इंग्लंडकडून खेळताना एमीने १५१५ धावा केल्या. २०१३ मध्ये तिने वन डेमध्ये पदार्पण केले.

समलिंगी विवाह करणाऱ्या खेळाडूंमध्ये आणखी काही महिला खेळाडूंचा समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी इंग्लंडची महिला खेळाडू डॅनियल वॅटने तिची प्रेयसी जॉर्जी हॉजसोबत लग्न केले. वॅटने भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते.