प्रती लिटर ४००० रुपये किमतीचं 'ब्लॅक वॉटर' पितो विराट कोहली; जाणून घ्या त्यामागचं कारण

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा फिटनेसला किती महत्त्व देतो, हे सर्वांना माहित आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा फिटनेसला किती महत्त्व देतो, हे सर्वांना माहित आहे. भारतीय संघात खेळाडूंच्या फिटनेससाठी Yo yo टेस्टची संकल्पना ही विराटनेच आणली. त्यामुळेच सध्याच्या घडीतील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली आघाडीवर आहे.

विराट तंदुरुस्तीसाठी जिममध्ये तासंतास घाम गाळतोच, शिवाय काटेकोर डाएट प्लानही त्यानं आखले आहेत. त्यासाठी विराट शाकाहारी बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ वर्षांपूर्वी पदार्पण करणारा विराट हा आजही तितकाच तंदुरूस्त व अॅक्टिव्ह आहे.

व्यायाम व डाएट हेच विराटच्या तंदुरुस्तीमागचं कारण नाही, तर त्याच्या डाएट प्लानमध्ये असलेलं पाणी यानंही मदत मिळते. होय हे ऐकून धक्का बसला असेल. विराट कोहली ‘Black Water’ पितो. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी हे विरट ब्लॅक अल्कलाइन वॉटरचं (Alkaline Black water) सेवन करतो.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, श्रुती हसन याही ब्लॅक वॉटरचं सेवन करतात. ब्लॅक वॉटर तयार करण्यासाठी ब्लॅक मिनरल्सचा (Black minerals) वापर केला जातो. पाण्यात 70 टक्के खनिजं टाकली जातात, त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. यामुळेच हे पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त हेल्दी (Black water healthy) होतं.

या पाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. बीपी, डायबिटिस आणि हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते.

ब्लॅक वॉटरमध्ये पाण्याचे कम्पाऊंट्स साध्या पाण्याच्या तुलनेत लहान असतात म्हणून ते शरीरात लगेच शोषले जातात. त्यामुळे शरीर जास्तवेळ हायड्रेट राहते. स्नायू जास्त लवकर बळकट होतात आणि सांधे देखील ल्युब्रिकंट व्यवस्थित होतात.

ब्लॅक वॉटरच एसिडिटी कमी करून शरीरातील पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. या पाण्यामुळे शरीराच्या विविध अवयवांतून निर्माण होणारं अॅसिड नियंत्रणात राहतं. अल्कलाइन वॉटर पचनक्रिया (Black water for metabolism) चांगली करते.

या पाण्याच्या सेवनानं रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. दिवसभर फ्रेश वाटतं. ब्लॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात त्यामुळे कॅलरीज कमी होण्यास मदत होते. हे पाणी फ्री रेडिकल्स कमी करण्यात मदत करतात. त्वचेसह, केसांसाठी या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरतं.

या पाण्याची किंमत ३ ते ४ हजार रुपये प्रति लिटर एवढी असते. (It costs a whopping Rs 3,000-4,000, according reports although some cheaper versions of the ‘black water’ are currently available in the market) सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर हे ब्लॅक वॉटर आहे.

Read in English