वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...

Happy Birthday Arjun Tendulkar : आज अर्जुन तेंडुलकरचा २५वा वाढदिवस आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज त्याचा २५वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट विश्वातील आजी माजी खेळाडू अर्जुनला त्याच्या खास दिवशी शुभेच्छा देत आहेत.

त्याची बहीण सारा तेंडुलकरने देखील काही दुर्मिळ फोटो शेअर करत आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या.

सारा तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले की, आमच्या घरातील बाळाला आणि माझ्या जगाच्या केंद्रस्थानी असलेल्याला २५व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझा नेहमीच अभिमान वाटतो.

आज मंगळवारी अर्जुन तेंडुलकरचा २५वा वाढदिवस आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मेहनत घेत आहे.

आयपीएल २०२३ च्या हंगामातून त्याने जगातील सर्वात मोठ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये पदार्पण केले. जगभरातील क्रिकेटपटू सचिनच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.