Team India, IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार?

Team India, IND vs BAN: भारत-बांगलादेश कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून होणार सुरुवात

Team India, IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १६ खेळाडूंची निवड केली.

भारतीय संघ- रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ सामन्याच्या दिवशी जाहीर होईल. परंतु गेल्या काही महिन्यांचा पॅटर्न पाहता, टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सर्वोत्तम खेळाडूंना संधी देताना 'या' ५ खेळाडूंना बाकावर बसवले जाण्याची दाट शक्यता आहे.

रवींद्र जाडेजा खेळत असताना अक्षर पटेलला संधी मिळणे कठीण आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात अक्षर बाकावर होता. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही जाडेजासह कुलदीप आणि अश्विनला संधी मिळू शकते.

भारतीय संघात सहसा दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरतो. सध्या संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. अशा वेळी यश दयालला बाकावर बसवले जाईल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या अनुभवी जोडगोळीला संधी मिळू शकेल.

सर्फराज खानला टीम इंडियात संधी मिळणे कठीणच आहे. त्याची फिरकीविरुद्धची कामगिरी चांगली आहे. पण केएल राहुल पहिल्या कसोटीत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि त्यामुळे सर्फराजला बेंचवर बसावे लागेल.

इंग्लंडविरूद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत ध्रुव जुरेलने फलंदाजीसोबतच किपिंगमध्येही कमाल केली. मात्र, आता रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. पंत पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला संघात जागा मिळवायला वाट पाहावी लागेल.

आकाश दीपने इंग्लंड विरुद्धच्या रांची कसोटीत पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्याच्या पहिल्या स्पेलमध्ये तीन विकेटही घेतल्या. तेव्हा बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. आता बुमराह नक्कीच खेळणार असल्याने आकाश दीपला बाहेर बसावे लागेल.