India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. चांगल्या फॉर्मात असलेला वॉशिंग्टन कारकिर्दीत पहिले कसोटी शतक पूर्ण करेल असे वाटले होते, पंरतु अक्षर माघारी परतला अन् टीम इंडियाचे दोन फलंदाज गुंडाळण्यात इंग्लंडला फार कष्ट घ्यावे लागले नाही. वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली.