PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!

अभिषेक अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असून, तिथे टीम इंडियाची युवा ब्रिगेड शनिवारपासून पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळलेल्या भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

त्यामुळे झिम्बाब्बे दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये आयपीएल गाजवणाऱ्या अभिषेक शर्माचा देखील समावेश आहे.

अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आयपीएल २०२४ मध्ये ती अनेकदा अभिषेकला चीअर करताना दिसली आहे.

२६ वर्षीय कोमल शर्मा ही पेशाने डॉक्टर आहे. कोमल ही अभिषेकची लहान बहीण असून ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

अभिषेक अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिषेक जेव्हा कोणताही मोठा पराक्रम करतो त्यावेळी तो नेहमी त्याचे यश आणि आनंद आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो.

अभिषेक शर्माला एक मोठी बहीण देखील आहे. तिचे नाव सानिया शर्मा आहे. परंतु ती प्रसिद्धीपासून दूर आहे.

डॉक्टर असलेल्या कोमल शर्माने आता काही फोटो शेअर केले आहेत. डॉक्टरच्या वेशभूषेत दिसत असलेल्या कोमलने कॅप्शनमध्ये म्हटले की, चमत्कार आणि आशेच्या व्यवसायात आहे.

बहीण कोमलच्या या पोस्टवर व्यक्त होताना अभिषेक शर्माने हसण्याची इमोजी शेअर केली. दरम्यान, ६ जुलै ते १४ जुलै या कालावधीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सर्व सामने खेळवले जातील. भारताची युवा ब्रिगेड यजमान संघाचा पराभव करते का हे पाहण्याजोगे असेल.

आयपीएल २०२४ मध्ये अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना २०४.२१ च्या स्ट्राईक रेटने १६ सामन्यांत ४८४ धावा कुटल्या. त्याने एका हंगामात ४२ षटकार मारण्याची किमया साधली.