India vs England 2nd Test Live : इंग्लंडच्या टीमसह भारतीय खेळाडू लाल टोपी घालून उतरले मैदानावर, जाणून घ्या त्यामागचं कारण!

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर राहिले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला झटपट चार धक्के दिले.

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर राहिले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला झटपट चार धक्के दिले. लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी गाजवताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लोकेश दमदार खेळ करून अनेक विक्रम मोडेल, असे वाटत होते.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत त्यानं तसे संकेतही दिले. पण, पुढच्याच चेंडूवर कव्हरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला अन् इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ऑली रॉबिन्सननं ही विकेट मिळवून दिली. लोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. भारताचा निम्मा संघ २८२ धावांत माघारी परतला आहे.

रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पंत त्याच्या नेहमीच्या आक्रमक अंदाजात होता. पण, मार्क वूडनं त्याला बाद न होण्यासारख्या चेंडूवर माघारी जाण्यास भाग पाडले. पंत ३७ धावांवर झेलबाद झाला अन् जडेजासोबतची त्याची भागीदारी ४९ धावांवर संपुष्टात आली.

दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ७ बाद ३४६ धावा झाल्या होत्या, रवींद्र जडेजा व इशांत शर्मा खेळपट्टीवर आहेत. पण, आजच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू लाल कॅप घालून मैदानावर उतरले होते.

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल कॅप घालून रुथ स्ट्रॉस कँसर फाऊंडेशनसाठी निधी गोळा केला जातो. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस यानं ही संस्था स्थापन केली आहे. त्याच्या पत्नीचं २०१८मध्ये कँन्सरमुळे निधन झाले होते.

तिच्या मृत्यूनंतर स्ट्रॉसनं ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ याच्याशी संपर्क साधला अन् कँसरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला. मॅक्गाथच्याही पत्नीचं कँसरमुळे निधन झाले होते आणि त्यानंही जेन मॅक्ग्राथ फाऊंडेशन सुरू करून कँसरग्रस्तांसाठी मदत करतोय.

लॉर्ड्स कसोटीचा दुसरा दिवस हा ‘Red for Ruth’ हा नावानं साजरा केला जातो.