India vs England 2nd Test : विराट कोहलीनं ग्रेट क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला, लॉर्ड्सवर बाजी मारणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला.

अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं चौथ्या दिवशी विक्रमी १०० धावांची भागारी करून विजयाचा पाया रचला पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजनं सर्वाधिक चार, जसप्रीतनं तीन, इशांत शर्मानं दोन आणि शमीनं एक विकेट घेतली

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ३७वा कसोटी विजय ठरला. यासह त्यानं क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला. ग्रॅमी स्मिथ ( ५३), रिकी पाँटिंग ( ४८), स्टीव्ह वॉ ( ४१) हे विराटच्या पुढे आहेत.

SENA देशांमध्ये विराटचा हा पाचवा विजय ठरला आणि भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयांमध्ये विराट टॉपवर आहे. महेंद्रसिंग धोनी व मन्सूर अली खान पतौडी प्रत्येकी ३ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

लॉर्ड्सवर भारताचा हा तिसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं ५ विकेट्स राखून विजय मिळवला होता, त्यानंतर २०१४नंतर महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ९५ धावांनी विजय मिळवला होता. विराटच्या संघानं मिळवलेला विजय हा लॉर्ड्सवरील मोठा विजय ठरला.

मोहम्मद सिराजनं या सामन्यात १२६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. त्यानं कपिल देव यांचा ८ बाद १६८ धावांचा विक्रम मोडला. आर पी सिंगनं ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या.

लॉर्ड्सवर मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा लोकेश राहुल हा चौथा भारतीय ठरला. यापूर्वी दीलीप वेंगसरकर १९७९, कपिल देव १९८६ आणि इशांत शर्मा २०१४ यांनी हा मान पटकावला.