IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या

Mayank Yadav Record, IND vs BAN 1st T20: मयंक यादवने १५०च्या आसपासच्या वेगाने तुफानी गोलंदाजी केली.

भारतीय संघाने ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत ७ गडी राखून विजयी सलामी दिली. बांगलादेशने दिलेले १२८ धावांचे आव्हान भारतीय संघाने ११.५ षटकांतच पार केले आणि सामना जिंकला.

भारतीय गोलंदाजांनी सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्यातही पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मयंक यादवचे विशेष कौतुक करण्यात आले. त्याने १ विकेट घेतली.

मयंक यादवने आंतरराष्ट्रीय टी२०चे पहिले षटक निर्धाव ( Maiden ) टाकले. T20I मध्ये अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला. जाणून घेऊया याआधी ही कामगिरी करणारे भारतीय.

टीम इंडियाचा सध्याचा संघ निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने २००६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या टी२० करियरचे पहिले षटक निर्धाव टाकले होते.

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने २०१८मध्ये अशीच कामगिरी केली. तो सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आला होता.

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यानेदेखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातूनच पदार्पण केले होते. त्याने २०१९ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिले षटक मेडन टाकले होते.

टी२० वर्ल्डकपच्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेल्या अर्शदीप सिंगने देखील ही किमया साधली होती. त्याने २०२२ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना मेडन ओव्हर टाकली होती.