2) रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व सांभाळताना धोनीनं युवा गोलंदाजांना संधी देण्याचं सोडून वयस्कर गोलंदाजांना खेळवलं. CSKचे नेतृत्व सांभाळताना धोनीनं संघाला 11 पैकी 10 वेळा प्ले ऑफपर्यंत मजल मारली. पण, 2016चा मोसम त्याला अपवाद ठरला. त्यानं इरफान पठाण, रजत भाटीया, आरपी सिंग, अकोस दिंडा आणि इशांत शर्मा यांना खेळवले, परंतु यापैकी कोणालाच चांगली कामगिरी करता आली नाही. त्या पर्वातील 49व्या सामन्यात RPSने दीपक चहरला संधी दिली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. इश्वर पांडे व जस्करन सिंग यांना एकही सामना खेळता आला नाही.