IPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमासाठीचा मार्ग मोकळा झाला. 19 सप्टेंबरपासून दुबईत ही स्पर्धा खेळवण्याचे गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. पण, अजूनही केंद्र सरकारची परवानगी त्यांना मिळालेली नाही.

आयपीएल होणार असल्यानं भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, परंतु त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडूंना खेळता येणार नाही किंवा ते उशीरा दाखल होणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे अऩेक देशांमध्ये प्रवासबंदी आहे.

लसिथ मलिंगा ( मुंबई इंडियन्स), श्रीलंका; लंकन प्रीमिअर लीग

इसुरू उडाना ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), श्रीलंका; लंकन प्रीमिअर लीग

आरोन फिंच ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

अँड्य्रू टाय ( राजस्थान रॉयल्स), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

मार्कस स्टॉयनीस ( दिल्ली कॅपिटल्स), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

केन रिचर्डसन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

अॅलेक्स कॅरी ( दिल्ली कॅपिटल्स), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

ग्लेन मॅक्सवेल ( किंग्स इलेव्हन पंजाब), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

पॅट कमिन्स ( कोलकाता नाईट रायडर्स), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

स्टीव्ह स्मिथ ( राजस्थान रॉयल्स), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

डेव्हिड वॉर्नर ( सनरायझर्स हैदरबाद), ऑस्ट्रेलिया; उशीरा दाखल होणार

डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

फॅफ ड्यू प्लेसिस ( चेन्नई सुपर किंग्स), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

कागिसो रबाडा ( दिल्ली कॅपिटल्स), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

ख्रिस मॉरिस ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

डेल स्टेन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

एबी डिव्हिलियर्स ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), दक्षिण आफ्रिका, प्रवासबंदी

आंद्रे रसेल ( कोलकाता नाईट रायडर्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

ओशाने थॉमस ( राजस्थान रॉयल्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

निकोलस पुरन ( किंग्स इलेव्हन पंजाब), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

शेल्डन कोट्रेल ( किंग्स इलेव्हन पंजाब), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

ड्वेन ब्राव्हो ( चेन्नई सुपर किंग्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

किमो पॉल ( दिल्ली कॅपिटल्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

शिमरोन हेटमायर ( दिल्ली कॅपिटल्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

किरॉन पोलार्ड ( मुंबई इंडियन्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

सुनील नरीन ( कोलकाता नाईट रायडर्स), वेस्ट इंडिज, कॅरेबीयन प्रीमिअर लीग/ उशीरा दाखल होणार

इंग्लंडचे इयॉन मॉर्गन ( कोलकाता नाईट रायडर्स), सॅम कुरन ( चेन्नई सुपर किंग्स), जेसन रॉय ( दिल्ली कॅपिटल्स), ख्रिस वोक्स ( दिल्ली कॅपिटल्स), टॉम बँटन ( कोलकाता नाईट रायडर्स), जोफ्रा आर्चर ( राजस्थान रॉयल्स), बेन स्टोक्स ( राजस्थान रॉयल्स), जोस बटलर ( राजस्थान रॉयल्स), मोईन अली ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), जॉनी बेअरस्टो ( सनरायझर्स हैदराबाद) हेही उशीरा दाखल होणार आहेत.