IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

IPL Retention List : शुक्रवारी आयपीएलच्या सर्व दहा फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केले नाही. मागील वर्षी झालेल्या मिनी लिलावात त्याला २४.७५ कोटी रुपये मिळाले होते.

ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार मिचेल मार्श लिलावाच्या मैदानात असेल. त्याला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले आहे.

आयपीएल २०२४ चा हंगाम म्हणजे ग्लेन मॅक्सवेलसाठी एक वाईट स्वप्नच. मॅक्सवेलला याचा फटका बसला असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला रिटेन केले नाही.

स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नाही.

लखनौ सुपर जायंट्सने आपला कर्णधार लोकेश राहुलला रिटेन केले नाही. त्यामुळे तो लिलावात दिसेल.

कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर लिलावात असेल. केकेआरच्या संघाने अय्यरला कायम ठेवले नाही.

मोहम्मद सिराजलादेखील आरसीबीने रिलीज केले आहे. त्यामुळे तो लिलावात असेल.

मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंना रिटेन केले मात्र त्यात इशान किशनचा समावेश नाही. त्यामुळे किशनही लिलावाच्या मैदानात असेल.

पंजाब किंग्जने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला रिटेन केले नाही.

स्फोटक सलामीवीर जोस बटलरला राजस्थान रॉयल्सने रिटेन केले नाही. त्याने आयपीएल २०२४ च्या हंगामात ११ सामन्यांत ३५९ धावा केल्या होत्या.