अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी

mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला.

भारतीय संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या संघाने रणजी करंडक स्पर्धा जिंकली.

यंदा त्याच्याच नेतृत्वात मुंबईने इराणी चषकाचा किताब उंचावला. मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रहाणेकडे पाहिले जाते. नेहमीप्रमाणे रणजी करंडक स्पर्धेतील विजेता संघ विरुद्ध शेष भारत अशी लढत झाली.

हा सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातील चांगल्या आघाडीमुळे मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२०-२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली होती.

याशिवाय देवधर ट्रॉफी (२०१८), दुलीप ट्रॉफी (२०२२-२३) आणि रणजी करंडक स्पर्धेत (२०२४) रहाणेने आपल्या नेतृत्व कौशल्याने संघाला विजय मिळवून दिला.

तसेच रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला कसोटी जिंकली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल असो की मग देशांतर्गत क्रिकेट... अजिंक्य रहाणेने नेहमीच नेतृत्व करताना आपली प्रतिभा दाखवून दिली.

कर्णधार म्हणून अजिंक्यने केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईचा संघ अजिंक्य राहिला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने इराणी चषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे.

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर... विजयानंतर आनंद साजरा करताना.