महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या लग्नाचा आज 10 वा वाढदिवस...

4 जुलै 2010मध्ये माहीनं साक्षीसोबत विवाह केला. 3 जुलैला देहराडून येथील हॉटेलमध्ये त्यांनी साखरपुडा उरकला.

महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या लग्नाला मोजक्याच मित्रांना बोलावले होते. त्यामुळेच धोनीच्या लग्नाबद्दल जेव्हा माहित पडले, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

2007 मध्ये कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघं चांगले मित्र बनले.

धोनी आणि साक्षी बालपणी काही काळासाठी एकाच शाळेत शिकत होते, अशीची चर्चा आहे.

साक्षीनं सुरुवातीचं शिक्षण देहराडून येथील वेलहेम शाळेत पूर्ण केलं आणि त्यानंतर तिनं औरंगाबाद येथील इंस्टीट्यूट ऑफ हॉटल मॅनेजमेंटमध्ये डीग्री पूर्ण केली.

त्यानंतर इंटर्नशीपसाठी साक्षी कोलकाता येथील ताज बंगाल हॉटेलमध्ये काम करत होती. तिथेच धोनी आणि तिची भेट झाली.

धोनी आणि साक्षी यांना पाच वर्षांची मुलगी आहे.

Read in English