'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!

PM Modi meets T20 World Champions Family: पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत आलेल्या कुटुंबीयांची आवर्जून चौकशी केली.

टीम इंडियाने तब्बल १७ वर्षांनी टी२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयाचा जल्लोष आज दिवसभर भारतात सुरु आहे.

वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देणारा सामनावीर विराट कोहली याने आज संघासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

PM मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेल्या संघासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. मालिकावीर जसप्रीत बुमराह, त्याची पत्नी संजना गणेसन आणि मुलगा अंगद यांच्याशी मोदींनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील युवा खेळाडू अर्शदीप सिंगचे कुटुंबीय यांचीही विचारपूस केली आणि फोटो काढला.

यावेळी BCCI कडून अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नमो' असे नाव छापलेली 1 नंबरची खास जर्सी भेट दिली.

भाजपा आमदार असलेली रिवाबा जाडेजा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांनी पंतप्रधानांसोबत फोटो काढला.

वर्ल्डकप फायनलच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

सीमीरेषेवर निर्णायक झेल घेऊन विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविना शेट्टी या दाम्पत्यासोबतही पंतप्रधानांनी फोटोसाठी पोझ दिली.