क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती

जॉर्ज प्लॉईड (George Floyd) या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संताप व निषेधाची लाट उसळली आहे.

यातच, युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखले जाणारा वेस्ट इंडीजचा सलामीवीर खेळाडू ख्रिस गेलने सांगितले की, त्याच्याही क्रिकेट कारकिर्दीत त्यालाही वर्णद्वेषी टिप्पण्यांचा सामना करावा लागला.

'ब्लॅक लाइव्हज् मॅटर' या मोहिमेवर एकता दर्शविताना वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने असा आरोप केला की क्रिकेटमध्ये देखील वर्णद्वेष केला जातो.

ख्रिस गेलने त्याला वर्णभेदाच्या टीकेला कधी सामोरे जावे लागले, याचा त्याने खुलासा नाही केला. मात्र, वर्ल्डकप टी -२० लीग दरम्यान असे झाल्याचे संकेत त्याने दिले आहे.

सोशल मीडियावर त्याने लिहिले की, 'मी जगभर खेळलो आहे आणि कृष्णवर्णी असल्यामुळे वर्णद्वेषाच्या टिप्पण्यांचा सामना केला आहे.'

ख्रिस गेलने त्याला इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'कृष्णवर्णी लोकांचे आयुष्यही इतरांच्या आयुष्यासारखे असते. कृष्णवर्णी लोक महत्व ठेवतात. (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर) वर्णद्वेषी लोक नरकात जातील.'

तो म्हणाला, 'मी संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे आणि वर्णद्वेषाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. कारण मी कृष्णवर्णी आहे.'

याचबरोबर ख्रिस गेल म्हणाला, 'वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नाही. तर हा क्रिकेटमध्येही आहे. अगदी संघांमधेही मला कृष्णवर्णी असल्याचे वाटत आले आहे.'

अमेरिकेतील जॉर्ज प्लॉईड या कृष्णवर्णी व्यक्तीच्या निधनानंतर ख्रिस गेलने हे विधान केले आहे.

जॉर्ज प्लॉईड यांच्यामुळे अमेरिकेत संताप व निषेधाची लाट उसळली आहे.

या संतापाचे, आंदोलनाचे लोण अमेरिकेतील १४० शहरांमध्ये पसरले असून, या परिस्थितीमुळे किमान ४० शहरांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे.

Read in English