CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos

Rohit Sharma CM Eknath Shinde grandson: मुंबईकर जगज्जेत्या खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यावेळी छोट्या समायराचा बाबा असलेल्या रोहित शर्मा एकनाथ शिंदे यांच्या नातवाशी याच्याशी गोड संवाद साधला.

T20 विश्वविजेत्या भारतीय संघातील 'मुंबईकर' खेळाडूंचा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी गौरव केला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला शाल व गणपती बाप्पाची मूर्ती देऊन एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला.

मोक्याच्या क्षणी सीमारेषेवर झेल पकडून भारताला फायनलचा सामना जिंकवणारा सूर्यकुमारही यावेळी उपस्थित होता.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याचाही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

भारतीय क्रिकेटचे भविष्य असलेल्या युवा यशस्वी जैस्वालचे देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कौतुक करण्यात आले.

भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनाही यावेळी गौरवण्यात आले.

टीम इंडियाचे व्यवस्थापन सांभळणाऱ्या टीमपैकी अरूण कानडे यांचाही आज शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोहित शर्मा आणि एकनाथ शिंदे यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांचे रेखाटलेले चित्र यावेळी रोहितला भेट देण्यात आले.

भारताचा तडफदार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे रेखाटलेले एक सुंदर चित्र त्यालाही भेट देण्यात आले.

सूर्यकुमार यादवसाठी जीव की प्राण असलेली क्रिकेट बॅट यावेळी त्याने स्वत: स्वाक्षरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान रोहित शर्माने एकनाथ शिंदे यांच्या नातवाशीही धमाल गप्पा-गोष्टी केल्या. (सर्व फोटो- एकनाथ शिंदे ट्विटर अकाऊंट)