PHOTOS : सचिनच्या लेकीचा बोल्ड अवतार; ग्लॅमरस लूकने खुलले सौंदर्य सारा तेंडुलकरचे!

Sara Tendulkar Hot Look : सारा तेंडुलकरने काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

भारतीय क्रिकेटचा चेहरा अर्थात सचिन तेंडुलकर... दिग्गज फलंदाज म्हणून सचिनची जगभर ख्याती आहे. आता सचिनच्या मुलीने काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

अलीकडेच तिने ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

सारा तेंडुलकर उच्चशिक्षित आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले.

साराचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

सारा तेंडुलकरचा जन्म क्रिकेटचा दिग्गज सचिनच्या घरात झाला. यामुळे तिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला फार वेळ लागला नाही.