वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक मजेशीर किस्से आहेत आणि ते वारंवरा ऐकावेत असे क्रिकेट चाहत्यांना वाटते.

त्यापैकी एक किस्सा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यात घडला होता.

16 वर्षांपूर्वी जेव्हा वीरूनं मुल्तान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.

वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना स्ट्राईकवर असलेल्या वीरूला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब वारंवार बाऊंसर टाकत होता.

तेव्हा वीरूनं त्याला नॉनस्ट्राईकवर उभ्या असलेल्या तेंडुलकरला बाऊंसर टाकण्यास सांगितले. वीरू अख्तरला म्हणाला होता 'समोर बाप आहे.''

अख्तरनं असं काही घडलंच नसल्याचा दावा केला आहे. सेहवाग जगाला खोटी गोष्ट सांगतोय, असा अख्तर म्हणाला.

त्यानं पुढं म्हटलं की, मला असं कोणी बोलेल आणि मी त्याला असंच सोडून देईन, असं होईल का? वीरूला मी भेटलो तेव्हा याबाबत विचारलं होतं, तेव्हा त्यानं असं काही म्हटलं नाही, असं मला सांगितलं. तेव्हा गौतम गंभीरही तिथेच होता.

याच सामन्यात अख्तर वारंवार वीरूला चौका मार असं सांगत होता. त्यावर वीरूनं, तू बॉलिंग करतोस की भिक मांगत आहेत, असं विचारलं होतं.

अख्तरनं तसं काहीच घडलं नसल्याचं सांगितलं. हॅलो अॅपवर चॅट करताना अख्तरनं हा दावा केला.