मुकेश अंबानींपेक्षाही मोठं घर, ₹20000 कोटींची संपत्ती; या माजी क्रिकेटरचा 'थाट' अन् 'रईसी'समोर धोनी-कोहलीही फेल!

क्रिकेट हा भारतातील सर्वात हाय प्रोफाइल खेळ आहे. येथे पैशांचा अक्षरशः पाऊस पडत. एवढेच नाही तर, भारतीय संघाचे काही खेळाडू पैसे आणि संपत्तीच्या बाबतीत मोठ-मोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकतात. पण भारताचा सर्वात श्रीमंतर क्रिकेटर कोण? हे आपल्याला माहीत आहे का...?

आयसीसी T20 विश्वचषक 2024 भारताने जिंकला आहे. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली. या अविस्मरणीय विजयाबरोबरच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही टी-20 इंटरनॅशनल सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वात हाय प्रोफाइल खेळ आहे. येथे पैशांचा अक्षरशः पाऊस पडत. एवढेच नाही तर, भारतीय संघाचे काही खेळाडू पैसे आणि संपत्तीच्या बाबतीत मोठ-मोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकतात. पण भारताचा सर्वात श्रीमंतर क्रिकेटर कोण? हे आपल्याला माहीत आहे का?

धोनी आणि कोहलीपेक्षाही श्रीमंत - माध्यमांतील अनेक वृत्तांमध्ये दावा केला जातो की, कमावण्याच्या बाबतीत विराट कोहली, हा देशच नव्हे तर, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. त्याची संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जाते. मात्र एक क्रिकेटर असाही आहे, जो विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरपेक्षाही श्रीमंत आहे. हा क्रिकेटर किती श्रीमंत असावा? तर, या क्रिकेटरचे घर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चैअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया पेक्षाही मोठे आणि महागडे आहे. यावरूनच त्यांच्या संपत्तीचा अंदाजा लावला जाऊ शकतो.

समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड - आपण ज्या माजी क्रिकेटरसंदर्भात बोलत आहोत, त्यांचे नाव आहे समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड. 25 एप्रिल 1967 रोजी जन्मलेले समरजितसिंह हे गुजरातमधील बडोद्याच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. एवढेच नाही तर ते एक प्रथम श्रेणी क्रिकेटरही होते. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी सहा प्रथम श्रेणी सामनेही खेळले असून, ते बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत.

मुकेश अंबानी यांच्या एंटिलियापेक्षाही मोठं घर - समरजितसिंह गायकवाड हे रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे एकुलते एक पुत्र आहेत. समरजितसिंह हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक आहेत. हा पॅलेस ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसच्या तुलनेत चारपट मोठा आणि मुकेश अंबानी यांच्या एंटीलियापेक्षाही प्रचंड मोठा, तसेच अनेक पट महागडा आहे.

170 हून अधिक रूम - समरजितसिंह गायकवाड यांचा विवाह राधिका राजे यांच्याशी झाला आहे. त्या देखील वांकानेरच्या राजघराण्यातील आहेत. हाउसिंह डॉट कॉमनुसार, 170 हून अधिक रूम असलेले लक्ष्मी विलास पॅलेस 3,04,92,000 चौरस फूट क्षेत्रफळ एढ्या जागेवर पसरलेले आहे. तर मुकेश अंबानी यांचे अँटिलिया 48,7800 स्क्वेअर फूट एवढ्या परिसरात पसरले आहे. तसेच, बकिंगहॅम पॅलेस 828,821 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

किती आहे किंमत?- लक्ष्मी विलास पॅलेसची किंमत 2,43,93,60,00,000 रुपयांच्या जवळपास असल्याचे बोलले जाते. अर्थात तब्बल 25000 कोटी रुपयांच्या जवळपास. लक्ष्मी विलास पॅलेस महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे, यांनी 1890 साली बांधले होते. या आलिशान पॅलेसमध्ये गोल्फ कोर्सदेखील आहे.

समरजितसिंह यांची संपत्ती इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. त्यांच्या मालमत्तेचे मूल्य 20,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. समरजितसिंह गुजरात आणि बनारसमधील जवळपास 17 मंदिरांच्या ट्रस्टवर पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडतात.

विराटची संपत्ती? - विराट कोहली सध्या जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोहलीला बीसीसीआयच्या करारानुसार A+ श्रेणी मिळाली असून, त्याला बोर्डाकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक कसोटी सामन्याची फी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्याची फी 6 लाख रुपये तर टी-20 सामन्याची फी 3 लाख रुपये आहे. याशिवाय कोहलीला आयपीएल फ्रँचायझीकडूनही दरवर्षी जवळपास 15 कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो जाहिराती रेस्टॉरन्ट आदींतूनही बरीच कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती जवळपास 1000 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

सचिन-धोनीची संपत्ती - माध्यमांतील बऱ्याच वृत्तांनुसार, भारताचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकरच्या एकूण मालमत्तेसंदर्भात बोलायचे झाल्यास, सचिनकडे जवळपास 1,250 कोटी रुपये आहे. तर, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची एकूण संपत्ती अंदाजे 1,040 रुपये एढी आहे. याशिवाय हे दोघे जाहिराती आणि गुंतवणूकीतून वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतात.