'यशस्वी' डाव! सचिनसह ३ दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी; या खास क्लबमध्ये डॉन ब्रॅडमन टॉपला

यशस्वी जैस्वाल याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात मोठी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात पहिल्या डावात भोपळा पदरी पडलेल्या यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या डावात मोठी खेळी करत ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी अवस्मरणीय केली.

यशस्वी जैस्वालला चांगला स्टार्ट मिळाला की, तो मोठी खेळी करण्याची संधी चुकवत नाही. पर्थमध्येही त्याने हीच गोष्ट करून दाखवलीये. त्याने २९७ चेंडूचा सामना करताना १५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १६१ धावांची खेळी केली.

१५० प्लस धावा करताच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह तिघांच्या विक्रमाशी बरोबरी करत खास क्लबमध्ये एन्ट्री मारलीये. या क्लबमध्ये डॉन ब्रॅडमन टॉपला आहेत.

एक नजर कसोटी क्रिकेटमध्ये २३ पेक्षा कमी वय असताना सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या रेकॉर्ड्सवर

एक नजर कसोटी क्रिकेटमध्ये २३ पेक्षा कमी वय असताना सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या रेकॉर्ड्सवर

क्रिकेटचे डॉन अर्थात डॉन ब्रॅडमन यांनी वयाची २३ वर्षे पूर्ण करण्याआधी ८ वेळा १५० पेक्षा अधिक धावांची इनिंग खेळली होती.

या यादीत पाकिस्तानचा दिग्गज जावेद मियादांद यांचाही समावेश आहे. या दिग्गजाने ४ वेळा अशी कामगिरी केली होती.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं २३ वर्षे पूर्ण होण्याआधी ४ वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

एका डावात यशस्वी जस्वालनं जावेद मियादांद पासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांची बरोबरी केली आहे.

एका डावात यशस्वी जस्वालनं जावेद मियादांद पासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांची बरोबरी केली आहे.